नवीन वर्षात तीन अंगारिका चतुर्थीचा योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:50+5:302021-01-01T04:22:50+5:30
माजलगाव : येत्या नवीन वर्षात तीन अंगारिका चतुर्थी आल्या असल्याने नवीन वर्षात यामुळे संकट टळू शकते अशी भावना भाविकांमध्ये ...
माजलगाव : येत्या नवीन वर्षात तीन अंगारिका चतुर्थी आल्या असल्याने नवीन वर्षात यामुळे संकट टळू शकते अशी भावना भाविकांमध्ये दिसून येत आहे. मागील वर्षात एकही अंगारिका चतुर्थी न आल्यानेच संकट उभे राहिल्याची भावना व्यक्त होत आहेत. भारतीय समाजजीवनात श्रीगणेशाच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे. सर्व चतुर्थींमध्ये मोठी आणि महत्त्व असलेली चतुर्थी अंगारिका मानली जाते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका म्हणून संबोधले जाते. प्रत्येक महिन्याला ज्यांना चतुर्थी करणे शक्य होत नाही, असे भाविक अंगारकी चतुर्थीला मुद्दाम उपवास करतात. गेल्यावर्षी एकही अंगारिका चतुर्थी न आल्याने संकटमोचक गणपती कोपल्यामुळे कोरोनासारखे संकट आल्याची भावना भाविकातून बोलली जात आहे. यावर्षी तीन अंगारकी चतुर्थी आल्याने नवीन वर्षात कोरोना सारखे संकट नक्कीच टळेल असेही भाविक बोलतात.
एका वर्षात अनेक वेळा एकही अंगारकी चतुर्थी आलेली नव्हती. परंतु त्या त्या वर्षी असे कोणतेच संकट आल्याचे दिसुन येत नसले तरी येत्या मार्च महिन्यापर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होईल.
---अनंत जोशी ,शास्त्री, माजलगाव.
अंगारिकाचे योग
नवीन २०२१ वर्षात अंगारिका चतुर्थी २ मार्च ,२७ जुलै ,२३ नोव्हेंबर रोजी येत आहेत. तर २०२० मध्ये एकही अंगारकी चतुर्थी आली नव्हती.