'तुम्ही एकदा गमावून बघितलं; त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला': पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 08:17 PM2023-04-10T20:17:59+5:302023-04-10T20:18:36+5:30

प्रत्येक निवडणुकीत हार-जीत असते. राजकारणात असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही की त्याला पराभवाला सामोरे जावे लागले नाही.

'You once lost sight; It affected the politics of the state': Pankaja Munde | 'तुम्ही एकदा गमावून बघितलं; त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला': पंकजा मुंडे

'तुम्ही एकदा गमावून बघितलं; त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला': पंकजा मुंडे

googlenewsNext

परळी (बीड) : परळी बाजार समितीची निवडणुक प्रत्येकाने स्वतःची निवडणूक समजून लढायची आहे. ताकद आणि नियत असल्यामुळेच आपण सर्व रिंगणात उतरलो आहोत, तथापि, तुम्हाला इमान सांभाळून  स्वाभिमानाने लढण्याची तयारी ठेवावी लागेल. परिस्थिती आपल्या बाजूने आहे, मला तुमची काळजी आहे. अफवा, अमिषाला बळी पडू नका, जीव ओतून काम करा अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मतदारांना कानमंत्र दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतदार व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना पंकजाताई मुंडे बोलत होत्या. एन एच काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ही मतदार  संवाद बैठक मोठया उत्साहात पार पडली. पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रत्येक निवडणुकीत हार-जीत असते. राजकारणात असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही की त्याला पराभवाला सामोरे जावे लागले नाही. तुम्ही एकदा गमावून बघितलं आहे, त्याचा परिणाम मतदारसंघाच्या, जिल्हयाच्या आणि राज्याच्या राजकारणावर झालेला देखील पाहिला आहे. पण आता त्यासाठी तुम्हाला इमान गहाण न ठेवता काम करावं लागेल. उमेदवारी अर्ज भरताना तुमच्यात असलेला प्रचंड उत्साह मला दिसला. लढण्याची ताकद आणि नियत आहे म्हणूनच आपण रिंगणात उतरलो आहोत. सोसायटीसह सर्वच जागांवर परिस्थिती चांगली आहे. कोणाची किती ताकद आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे तरी देखील एक एक मत जो वाढवेल तो माझा खरा कार्यकर्ता असेल. तुमची मला काळजी आहे,  कोणत्याही अफवा, अमिषाला बळी न पडता आपली खुंटी मजबुत करा, काहीही झालं तरी ताईला सोडणार नाही अशी प्रतिज्ञा घ्या असं आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.

माझी निष्ठा तुमच्यावर
आजकाल कुणी काहीही स्टेटमेंट करत आहे, त्याकडे लक्ष देऊ नका. ही निवडणूक पक्षाची नाही.   दहा वीस पक्ष फिरून आलेले लोक माझ्या पक्ष निष्ठेवर बोलतात, आश्चर्य वाटतं. माझी निष्ठा फक्त तुमच्यावर आहे, तुमच्यासाठी वाट्टेल ते करायची माझी तयारी आहे अशा शब्दांत मुंडे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, रमेश कराड, दिलीप बिडगर, उत्तम माने, श्रीराम मुंडे,  राजेभाऊ फड, निळकंठ चाटे, राजेश गिते, प्रदीप मुंडे, व्यंकटराव कराड, साहेबराव चव्हाण, संतोष सोळंके, सुधाकर पौळ आदींसह तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीचे संचलन रवि कांदे यांनी केले.

Web Title: 'You once lost sight; It affected the politics of the state': Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.