विजेच्या धक्क्याने तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:34 AM2021-04-27T04:34:01+5:302021-04-27T04:34:01+5:30
बीड : शेतातील विजेचा मुख्य प्रवाह बंद करीत असताना तीव्र धक्क्याने एका ३० वर्षांचा तरुण ठार झाला. ही घटना ...
बीड : शेतातील विजेचा मुख्य प्रवाह बंद करीत असताना तीव्र धक्क्याने एका ३० वर्षांचा तरुण ठार झाला. ही घटना बीड तालुक्यातील अंथरवण पिंप्री शिवारात सोमवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास घडली.
ओम रामप्रसाद राऊत (वय ३०, रा. म्हाळसापूर) असे विजेच्या धक्क्याने ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ओम राऊत हा अंथरवण पिंप्री शिवारातील विजेचा मुख्य प्रवाह बंद करण्यासाठी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान गेला होता. यावेळी अचानक बसलेल्या विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती पिंपळनेर पोलीस व महावितरण या दोन्ही कार्यालयांत कळविण्यात आली. दरम्यान, पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आला होता. तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरातील गावावर शोककळा पसरली होती. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पिंपळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.