धबधबा पाहण्यासाठी गेलेला तरूण गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:38+5:302021-09-08T04:40:38+5:30

यशराज कुडके (वय १७ रा. कबाडगल्ली, बीड) असे मयताचे नाव आहे. जिल्ह्यात तीन दिवासांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे ...

The young man who went to see the waterfall carried away | धबधबा पाहण्यासाठी गेलेला तरूण गेला वाहून

धबधबा पाहण्यासाठी गेलेला तरूण गेला वाहून

Next

यशराज कुडके (वय १७ रा. कबाडगल्ली, बीड) असे मयताचे नाव आहे. जिल्ह्यात तीन दिवासांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे कपिलधार धबधब्याला पाणी आले आहे. हेच पाणी पाहण्यासाठी यशराज व ओंकार विभुते (वय १७ रा. माळीवेस, बीड) हे दोघे दुचाकीवरून गेले होते. याच दरम्यान कपिलधार जवळील छोट्या पुलावरील पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यांची दुचाकी घसरली. यात दोघेही वाहून जात होते. परंतु नागरिकांना ओंकारला वाचविण्यात यश आले तर यशराज वाहून गेला. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळताच बी.डी.मांडवे, बी.पी.माने आदी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे यशराजचा मृतदेह शोधण्यात अडचणी येत असून ग्रामस्थ व प्रशासनाकडून उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती.

Web Title: The young man who went to see the waterfall carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.