तरुणांनी कोरोना लसीकरणासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:29+5:302021-07-15T04:23:29+5:30

अंबाजोगाई : लसीकरणाच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती बराच काळ टिकून राहण्यास मदत होऊन कोरोना महामारीचा फैलाव किंवा परिणाम नियंत्रणात आणता येईल. ...

Young people should come forward for corona vaccination | तरुणांनी कोरोना लसीकरणासाठी पुढे यावे

तरुणांनी कोरोना लसीकरणासाठी पुढे यावे

googlenewsNext

अंबाजोगाई : लसीकरणाच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती बराच काळ टिकून राहण्यास मदत होऊन कोरोना महामारीचा फैलाव किंवा परिणाम नियंत्रणात आणता येईल. त्यामुळे कोरोना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन स्वाराती रुग्णालयातील लसीकरण विभागाचे समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दहिरे यांनी केले आहे.

येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात व स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविणे सुरू आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डा. दहिरे यांनी केले आहे.

अंबाजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व खोलेश्वर विद्यालय या दोन ठिकाणी लसीकरण सुरू आहे, तर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील १८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड लसीकरण करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जसजसे शासनाकडून लसीचे डोस प्राप्त होतील, त्यानुसार लसीकरण मोहीम नियमित राबविणे सुरू राहील. कोरोना विषाणूच्या महामारीपासून बचाव करायचा असेल, तर कोविड १९ प्रतिबंधात्मक लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वेगाने होणारा कोरोना संसर्ग आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाण तसेच गंभीर आर्थिक परिणाम विचारात घेता १८ वर्षांवरील सर्वांनी लस घेऊन लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. प्रशांत दहिरे यांनी केले आहे.

Web Title: Young people should come forward for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.