आरोग्य विभागाच्या मदतीला धावले युवा सामाजिक कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:54+5:302021-05-11T04:35:54+5:30
प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण केले पाहिजे. त्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र, गावाची विशेष मध्यवर्ती भागात कॅप घेऊन ...
प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण केले पाहिजे. त्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र, गावाची विशेष मध्यवर्ती भागात कॅप घेऊन लसीकरण करणे चालू आहे. त्या अनुषंगाने किल्लेधारूर शहरात ग्रामीण रुग्णालय वतीने नगरेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी तीन दिवस लसीकरण ठेवण्यात आले होते, पण सध्या सर्वत्र या रोगाची साथ असल्याने आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी पडत होते. त्यामुळे या मध्यवर्ती भागात लसीकरण करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी किल्लेधारूर शहरातील पत्रकार, विविध सामाजिक संस्था, समाजसेवक मदतीला धावून येत आरोग्य विभागाला मदत केली. आरोग्य विभागाने ६ मे ते ८ मे दरम्यान कोव्हॅक्सिन ४८६, कोविशिल्ड ७४४ लसीकरण केले. यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिक व १८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
पत्रकार, समाजसेवक यांनी लोकांना नोंदणी कशी करायचे मार्गदर्शन, सोशल डिस्टन्स ठेवणे, त्यांना बसण्याची व्यवस्था करणे, आरोग्य विभागाच्या नोंदणीसाठी मदत करणे असे अनेक कामे करण्यात आली. शहराचे मध्यवर्ती ठिकाण नगरेश्वर मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले. त्यासाठी सर्व वैश्य समाज बांधवांनी सहकार्य केले, तसेच यामध्ये वसुंधरा मित्र मंडळ, सकल मराठा समाज, किल्लेधारूर युथ क्लब, कायाकल्प फाउंडेशन यांच्या सदस्यांनी खूप मदत केली. आरोग्य विभागाचे कर्मचारी, आनंद भावठनकर, विजय शिनगारे, सुरेश शिनगारे, सुधाकर शेळके, ज्ञानेश्वर शिंदे, रोहन हजारी, निखिल पाथरकर, अश्विन गुळवे, अनिल तिवारी, गोविंद कोकाटे यांनी मदत केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चेतन अदमाणे यांनी सर्वांचे आभार मानत पत्रकार व सामाजिक संस्था सदस्यांच्या मदतीमुळे तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात लसीकरण करता आले. यापुढे असेच सहकार्य द्यावे, आपण नक्की कोरोना या रोगाला हरवू या, असा विश्वास व्यक्त केला.
===Photopath===
100521\img-20210507-wa0125_14.jpg