तुमचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, २४ तासांत सिम ब्लॉक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:52+5:302021-05-29T04:25:52+5:30

बीड : ‘डिअर सिम युझर, तुमचे डाॅक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असून प्लीज, आमच्या कस्टमर सेवेशी संपर्क साधा, नाहीतर तुमचे सिम ...

Your verification is pending, SIM will be blocked in 24 hours | तुमचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, २४ तासांत सिम ब्लॉक होणार

तुमचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, २४ तासांत सिम ब्लॉक होणार

Next

बीड : ‘डिअर सिम युझर, तुमचे डाॅक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असून प्लीज, आमच्या कस्टमर सेवेशी संपर्क साधा, नाहीतर तुमचे सिम कार्ड २४ तासांत ब्लाॅक होईल,’ अशा भुलविणाऱ्या मेसेजने सध्या बीएसएनएल ग्राहकांच्या मोबाईलमध्ये धुमाकूळ घातला असून काहीजण दिलेल्या नंबरवर संपर्क साधून स्वत:ची फसवणूक करीत आहेत.

मागील काही महिन्यांपासून असे मेसेज येत असल्याने ग्राहकही आपले सिम ब्लॉक होऊ नये म्हणून संबंधित नंबरशी संपर्क साधल्यानंतर डाॅक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्ले स्टोअरवरून टीम व्ह्युअर, एनीडेस्क व अन्य ॲप डाऊनलोड करण्यास सांगत आहेत. या माध्यमातून ग्राहकाला लुबाडण्याचा फंडा ऑनलाइन ठकसेन वापरत आहेत. याला अनेक ग्राहक कुठलीही खातरजमा न करता बळी पडत असून आर्थिक नुकसान झाल्यानंतर फसवणूक लक्षात येत आहे. बीड शहरात मागील काही दिवसांपासून असे शेकडो ग्राहक बीएसएनएल कार्यालय तसेच सिम वितरकांकडे अशा मेसेजबाबत विचारणा करून खात्रीदेखील करीत आहेत.

कंपनीच्या अधिकृत मेसेजवरच विश्वास ठेवण्याची गरज

वास्तविक पाहता बीएसएनएलकडून ग्राहकांना दररोज मेसेज पाठविले जात आहेत. बीएसएनएल सिम रिप्लेसमेंट व इतर बाबतींत ग्राहकांना व्हाॅटस‌्ॲपद्वारे मेसेज पाठवत नसून जर तसा मेसेज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला जात आहे. ग्राहकांनी या मेसेजवर विश्वास ठेवून भामट्यांपासून सावध राहायला हवे. तसेच डाॅक्युमेंट, सिम रिप्लेसमेंट स्थानिक कार्यालयातच करावे लागत असल्याने ऑनलाइन खटाटोप टाळला पाहिजे.

---------

ॲप डाऊनलोड करताच होईल फसवणूक

सिम ब्लॉक होऊ नये म्हणून संबंधित नंबरवर संपर्क साधणाऱ्या ग्राहकांना ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. ॲप डाऊनलोड करताच ग्राहकाच्या माेबाईलमधील डाटा क्लोनिंगद्वारे शेअर करून बँक खात्यातून रक्कम वळती करून घेतात. ग्राहकाच्या खात्यातून रक्कम कमी झाल्यानंतरच फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे अशा सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सजग नागरिकांनी केले आहे.

-------

Web Title: Your verification is pending, SIM will be blocked in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.