परळीत गावठी पिस्टलसह युवक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 06:54 PM2021-05-17T18:54:41+5:302021-05-17T18:55:00+5:30
शहरातील नाथ रोडवरील स्वाभिमान नगर परिसरात पोलिसांची कारवाई
परळी : विना परवाना व बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल बाळगल्याच्या कारणावरून येथील स्वाभिमाननगर मधील एका युवकास परळी शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी रात्री शिताफीने अटक केली. त्याच्याकडुन गावठी पिस्टल मँग्जिन पोलिसांनी जप्त केले. सोमवारी आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी परळी न्यायालयाने सुनावली आहे.
शहरातील नाथ रोडवरील स्वाभिमान नगर परिसरात एक जण थांबला आहे त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून युवकास ताब्यात घेतले. संदीप भास्कर फड ( 30 वर्ष रा. स्वाभिमाननगर परळी ) असे युवकाचे नाव असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल मॅगझीनसह आढळून आले. त्यात काडतुस नव्हते. त्याच्याकडे शस्ञ बाळगण्याचे कोणताही परवाना नव्हता.
या प्रकरणी जमादार भास्कर केंद्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही परळी शहरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जी बी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे,सुंदर केंद्रे ,श्रीकांत राठोड,शरद सुर्यवंशी यांनी केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार बालासाहेब चव्हाण हे करीत आहेत..सोमवारी परळी न्यायालयात आरोपीस पोलिसांनी हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.