पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:20+5:302021-07-14T04:39:20+5:30

गेवराई : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक व बीड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एक ...

Youth Congress launches one crore signature campaign against petrol, diesel and gas price hike | पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू

पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू

Next

गेवराई : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक व बीड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एक कोटी स्वाक्षरी अभियान राबवून केंद्र सरकारचे लक्ष वेधून ही भाववाढ कमी करावी या मागणीसाठी बीड जिल्हाभरात आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे यांनी दिली आहे. शहराजवळील कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंप येथे या स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रभारी राहुल संत व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गेवराई यासह संपूर्ण जिल्हाभरात १२ ते १५ जुलै दरम्यान स्वाक्षरी अभियान राबविले जाणार असून, बीड जिल्ह्यामध्ये तीन लक्ष सह्यांचे निवेदन करून केंद्र सरकारविरोधात राष्ट्रपती यांना दिले जाणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ देऊन भांडवलदारांना मोठे करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. दोन कोटी नोकऱ्या, १५ लाख यांचे विविध आश्वासने हवेत विरली आहेत. आता महाराष्ट्रातील व देशातील तरुणांमध्ये या सरकारविरुद्ध मोठा असंतोष असून, येत्या आठवडाभरामध्ये प्रत्येक तालुक्यातील शहराच्या ठिकाणी ही सह्यांची मोहीम राबविली जाणार असून, तीन लक्ष सह्यांचे निवेदन राष्ट्रपती महोदयांना दिले जाणार असल्याचे श्रीनिवास बेदरे म्हणाले. यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरण अजबकर, बळिराम गिराम, योगेश बोबडे, जिजा जगताप, नीलेश माळवे, शेख खुदुस, गोटू सावंत, राजू पोळघट, आदी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर उपस्थित होते. याप्रसंगी युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

120721\sakharam shinde_img-20210712-wa0045_14.jpg

Web Title: Youth Congress launches one crore signature campaign against petrol, diesel and gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.