अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 04:24 PM2021-12-22T16:24:01+5:302021-12-22T16:30:53+5:30
पैठण-बारामती रोडवरील चोभानिमगांव येथील घटना
कडा ( बीड ) : कडा येथील काम आटोपून चोभानिमगाव येथील घराकडे दुचाकीवरून परतणाऱ्या एका युवकाचा अपघातीमृत्यू झाल्याची घटना चोभानिमगाव परिसरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विकास दीपक शिंदे ( २३) असे मृत युवकाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील विकास शिदे हा मंगळवारी कामानिमित्त दुचाकीवरून ( एमएच १७ एस ५४०८ ) कडा येथे आला होता. काम संपल्यानंतर विकास दुचाकीवरून रात्री ८ वाजेच्या सुमारास घराकडे परत निघाला. दरम्यान, पैठण-बारामती रोडवरील चोभानिमगाव परिसरात विकास आला असता त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या विकासाचा जागीच मृत्यू झाला.
ऊसतोड मजुरांच्या वाहनाला अपघात; दोन ठार
धारूर (जि. बीड) : तालुक्यातील कोयाळ येथून ऊसतोडणी मजुरांना घेऊन निघालेली जीप उलटून दोघे ठार झाले तर पाच जण जखमी झाले. ही घटना परळी तालुक्यातील सरफराजपूर येेथे सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. विशाल गौतम वाव्हळे (१८) व वैजनाथ रामा वाव्हळे (६५, दोन्ही रा. कोयाळ) अशी मृतांची नावे आहेत. बाळासाहेब कोंडीबा मुंडे (३५), विश्वनाथ बालाजी वाव्हळे (५०), रमेश भगवान मुंडे (३४, सर्व रा. कोयाळ), अरुण नामदेव गायकवाड (६०), शोभा गायकवाड (५५, दोन्ही रा. तळेगाव), अनिता संजय डोंगरे (४०) आणि संजय दासू डोंगरे (५०, दोन्ही रा. हिंगणी) यांचा जखमींत समावेश आहे. अपघातानंतर कोयाळ ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी बाळासाहेब मुंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लातूरला हलवण्यात आले आहे. इतरांवर अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत.