जायभायवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:40 AM2018-11-01T00:40:27+5:302018-11-01T00:41:22+5:30
आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे.
धारुर : ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या जायभायवाडी गावाने पाणी फांडेशनच्या वॉटर कपमध्ये रचनात्मक काम करून पाणीदार गावाची ओळख महाराष्ट्राला करुन दिली. आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून गावातील शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा संकल्प केला.
जायभायवाडी हे गाव डोंगरात वसलेले. गावाची ओळख ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून. गावाला जायला धड रस्ताही नव्हता. मात्र, या गावाने श्रमदानाची चळवळ एकजुटीने पाणी फांऊडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतून राज्याला दाखवली व गावाची ओळख पाणीदार गाव म्हणून केली. लोकसहभागातून जायभायवाडीची वेगळी ओळख निर्माण करण्यात ग्रामस्थांना यश आले. केली. हे गाव कायमस्वरुपी दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत आहे.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झाल्याने जायभायवाडीच्या विकासाला दिशा मिळाली. पाणीदार गाव अशी ओळख झालेल्या गावाने शिक्षणाशिवाय गावाची प्रगती होऊ शकत नाही हे लक्षात घेत ऊस तोडीला मजूर जाताना शंभर टक्के मुले गावात थांबवण्यात यश मिळविले. उपसरपंचांनी विकासासाठी पुढाकार घेतला. डॉ. सुंदर जायभायेंनी शाळेकडे लक्ष दिले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून जायभायवाडी येथील जि. प. प्रा. शाळाडिजिटल करण्याचा संकल्प जि. प. चे सीईओ अमोल येडगे व गटशिक्षणाधिकारी गौतम चौपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. दोन्ही वर्ग डिजिटल करण्यात आलेले आहेत. दोन्ही वर्गांमध्ये फरशी बसविण्यात आलेली आहे. मोकळ्या जागेमध्ये फरशी बसविण्यात आलेली असल्याने सकाळी विद्यार्थ्यांना प्रार्थनेवेळी मातीमध्ये बसावे लागतं नाही. शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. याकामी शाळेचे मुख्याध्यापक गव्हाणे व सहशिक्षक गडदे यांनी परिश्रम घेतले. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही शिक्षक स्वत: लक्ष देऊन काम करुन घेत होते. ग्राम परिवर्तक जालिंदर वनवे यांचे सहकार्य मिळाले. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.
सोलार पॅनलचा वापर
महाराष्ट्र ग्राम परिवर्तनच्या माध्यमातून १ किलोवॅटचा सोलार पॅनल बसवण्यात आला आहे. यामुळे वीजपुरवठा बंद झाला तरी शाळेचा वीजपुरवठा सुरु राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी रात्रीचे वर्ग चालवणे सोपे जाणार आहे. शाळेसाठी २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली