जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून तहसीलदारांच्या आदेशाला टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:06+5:302021-05-23T04:33:06+5:30
माजलगाव : तालुक्यातील दिंद्रुड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम थांबविण्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून बांधकाम ...
माजलगाव
: तालुक्यातील दिंद्रुड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम थांबविण्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून बांधकाम करणे सुरूच ठेवत तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
दिंद्रुड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आजुबाजूला काही नागरिक राहत असून, या नागरिकांच्या घराजवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वच्छालय बांधण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. यानंतर तहसीलदारांनी या ठिकाणी नागरिक व संबंधित विभागाच्या अभियंत्यास आपल्या कार्यालयात बोलावून म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. येथील नागरिकांनी त्यांचे म्हणणे तहसीलदारांकडे सादर केले; परंतु संबंधित विभागाचे अभियंता या ठिकाणी न आल्याने येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्यास चार दिवसांपूर्वी येथील बांधकाम तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते.
तहसीलदारांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले असताना, येथील बांधकाम बंद न करता उलट दिवस-रात्र बांधकाम करण्याचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आम्हाला तहसीलदारांचे कसल्याही प्रकारचे आदेश नसल्याने बांधकाम थांबवण्याचा विषयच येत नाही.
--- संदीप सुरवसे, प्रभारी उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, जि. प. माजलगाव.
===Photopath===
220521\screenshot_2021-05-21-14-40-04-404_comgbwhatsapp_14.jpg