पडताळणीअभावी जि.प.कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:18 AM2019-03-19T01:18:30+5:302019-03-19T01:18:53+5:30

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती आणि वेतन पडताळणीच्या प्रक्रियेबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी आदेशित करुनही वित्त विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे सण उत्सवाच्या कालावधीत कर्मचा-यांना मार्च- एप्रिल महिन्यांचे वेतन सुधारीत दराने मिळण्याची शक्यता धुसर होत चालली आहे.

ZP workers will have to pay revised salary due to lack of verification | पडताळणीअभावी जि.प.कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन रखडणार

पडताळणीअभावी जि.प.कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन रखडणार

Next
ठळक मुद्देखातेप्रमुखांवर वेतन निश्चितीची जबाबदारी : वेतन निश्चितीनंतर पडताळणीसाठी मात्र कर्मचाऱ्यांचे खेटे

बीड : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती आणि वेतन पडताळणीच्या प्रक्रियेबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी आदेशित करुनही वित्त विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे सण उत्सवाच्या कालावधीत कर्मचा-यांना मार्च- एप्रिल महिन्यांचे वेतन सुधारीत दराने मिळण्याची शक्यता धुसर होत चालली आहे.
२० फेब्रुवारी रोजी शासनाच्या ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार जि.प. कर्मचाºयांची वेतन निश्चिती सुधारीत निकषाआधारे करण्यासंदर्भात १२ मार्च २०१९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी वेतन निश्चितीचे अधिकार प्रदान करण्याचे आदेश विभाग प्रमुखांना निर्गमित केले आहेत.
आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांनी अंमलबजावणी करून कर्मचाºयांची सुधारीत वेतन निश्चिती केली आहे. परंतु केलेल्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी वित्तलेखा विभागातील लेखा अधिकारी वर्ग - २ यांना आदेशित करूनही या आदेशाची वित्त विभागातील अधिकाºयांनी आतापर्यंत अंमलबजावणी केली नाही. झालेली वेतन निश्चिती पडताळणी करून घेण्यास अपंग व सर्वसामान्य कर्मचारी वित्त विभागातील अधिकारी कर्मचाºयांना साकडे घालण्यासाठी खेटे मारत आहेत.
बीड जिल्हा परिषदेचा वित्त विभाग गेल्या काही दिवसांपासून विविध कामे करताना शासकीय प्राधिकाºयाच्या आदेशाची पायमल्ली करण्यासाठी अग्रेसर आहे की काय ? अशी शंका जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या मनात निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद वित्त विभागातील अधिकारी कर्मचारी विशिष्ट हेतू ठेवून कर्मचाºयांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
कर्मचाºयांच्या वेतन पडताळणीसाठी दिरंगाई करणाºया तसेच आदेशाची पायमल्ली करणाºया लेखाधिकाºयांसह वित्त लेखा अधिकाºयांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी शासन मान्यताप्राप्त राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक आठवले जिल्हा अध्यक्ष महादेव सरवदे , राजेंद्र लाड, बाप्पा ढवळे, मदन लांडगे, अतुल मिटकरी, इंद्रजीत डांगे, आर.पी. शिंदे, वैशाली कुलकर्णी, सुरेखा खेडकर यांनी केली आहे.

Web Title: ZP workers will have to pay revised salary due to lack of verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.