२०२५ पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, वर्षभर पुण्य, सर्व इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:16 IST2025-01-16T07:16:07+5:302025-01-16T07:16:07+5:30

2025 First Paush Sankashti Chaturthi January: सन २०२५ ची पहिली संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता, व्रताचरणाची सोपी पद्धत आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या...

2025 first paush sankashti chaturthi date time vrat vidhi puja significance in marathi and chandrodaya timing of sankashti chaturthi january 2025 | २०२५ पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, वर्षभर पुण्य, सर्व इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ

२०२५ पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, वर्षभर पुण्य, सर्व इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ

2025 First Paush Sankashti Chaturthi January: सन २०२५ सुरू झाले आहे. अनेकार्थांनी हे वर्ष विशेष आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच पौष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साहात साजरी करण्यात आल्यानंतर आता पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत आहे. हजारो गणेश भक्त संकष्टी चतुर्थीचे व्रत मनापासून करतात. आपापल्या श्रद्धेनुसार भाविक संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. २०२५ची पहिली पौष संकष्ट चतुर्थी कधी आहे? प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ कोणती? या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय आहे? जाणून घेऊया...

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. 

पौष संकष्ट चतुर्थी: शुक्रवार, १७ जानेवारी २०२५

पौष संकष्ट चतुर्थी प्रारंभ: शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ०४ वाजून ०५ मिनिटे.

पौष संकष्ट चतुर्थी समाप्ती: शनिवार, १८ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ०५ वाजून ३० मिनिटे.

संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे

संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे
अहिल्यानगररात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
वर्धारात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून १० मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता १८ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे

 

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||

 

Web Title: 2025 first paush sankashti chaturthi date time vrat vidhi puja significance in marathi and chandrodaya timing of sankashti chaturthi january 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.