अंकशास्त्रानुसार तुमचा २१ मार्चचा दिवस कसा असेल घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:01 PM2022-03-21T15:01:43+5:302022-03-21T15:03:14+5:30

अंकशास्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. २१ मार्च २०२२ चा तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या.

21 march day according to numerology | अंकशास्त्रानुसार तुमचा २१ मार्चचा दिवस कसा असेल घ्या जाणून

अंकशास्त्रानुसार तुमचा २१ मार्चचा दिवस कसा असेल घ्या जाणून

Next

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्रवरुनही (Numerology) एखाद्या व्यक्तीसाठी शुभ दिवस कोणता, शुभ अंक कोणते याची माहिती मिळवता येते. अंकशास्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. २१ मार्च २०२२ चा तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या.

#नंबर १

  • (तुमचा जन्म कुठल्याही महिन्यातील १,१०,१९,२८ तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
  • तुमचा दिवस आनंददायी असेल. तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात पार्टनरला प्रभावित करून तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
  • शुभ रंग - हिरवा
  • शुभ दिन - रविवार
  • शुभ अंक - १ व ३
  • दान - पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करा.

#नंबर २

  • (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या २,१२, २०, २९ तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
  • आज तुम्ही तुमच्या भूतकाळातील सर्व यशांचा आनंद घ्याल. आज तुम्ही सोशल गॅदरिंग्समध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला ओळखी वाढवण्याची चांगली संधी मिळेल,
  • शुभ रंग - आकाशी
  • शुभ दिन - सोमवार
  • शुभ अंक - २ व ७
  • दान - गरिबांना किंवा जनावरांना तांदूळ दान करा.

#नंबर ३

  • (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ३,१२, २१, ३० तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
  • दान करण्यासाठी आणि तुमच्या गुरूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आजचा दिवस एकदम चांगला आहे. तुम्हाला आज भरपूर आर्थिक नफा होऊ शकतो.
  • शुभ रंग - गर्द जांभळा (Violet)
  • शुभ दिवस - गुरूवार
  • शुभ अंक - ९
  • दान - महिलांना कुंकू दान करा.

#नंबर ४

  • (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ४,१३, २२, ३१ तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
  • आज तुम्हाला मौजमजा आणि खरेदीचा आनंद घेता येईल. आज व्यावसायिक वाटाघाटी करताना तुमच्या मनातील भावनांना नियंत्रणात ठेवा.
  • शुभ रंग - जांभळा (Purpl)
  • शुभ दिन - शनिवार आणि बुधवार
  • शुभ अंक - ३ आणि ५
  • दान - लिंबूवर्गीय फळं दान करा.

#नंबर ५

  • (तुमचा जन्म कुठल्याही महिन्यातील ५,१४,२३ तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
  • आजचा दिवस वाद, विशेषत: कायदेशीर वाद सोडवण्यासाठी अतिशय चांगला. लग्नाची मागणी घालण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठीदेखील आजचा दिवस शुभ आहे.
  • शुभ रंग - निळा
  • शुभ दिन - बुधवार
  • शुभ अंक - ५ आणि ६
  • दान - लहान मुलांना पेय दान करा

#नंबर ६

  • (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ६,१५,२४ तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
  • व्यावसायिक करार आणि कायदेशीर निर्णयांमध्ये आज विलंब होईल. स्त्रिया आज आराम करू शकतात. कुटुंबामध्ये मिळालेल्या आदरासाठी स्त्रियांनी कुटुंबातील सदस्यांचे आभार मानावेत.
  • शुभ रंग - पीच (Peach)
  • शुभ दिन - शुक्रवार
  • शुभ अंक - ६
  • दान - निळ्या रंगाचं वस्त्र दान करावं

#नंबर ७

  • (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ७,१६, २५ तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
  • आज तुम्ही व्यवसायात जोखीम पत्करण्याचा विचार करत असाल तर अंगी नम्रता ठेवावी. आज वैयक्तिक आयुष्यात तुम्ही जबाबदारीनं वागाल. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारे नातेसंबंध प्रस्थापित होण्यास मदत मिळेल.
  • शुभ रंग - नारंगी (Orange)
  • शुभ दिन - सोमवार
  • शुभ अंक - ७ आणि ६
  • दान - मंदिरात दूध दान करा

#नंबर ८

  • (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
  • आज आपल्या सहकाऱ्यांसोबत असताना सावधगिरी बाळगा. आज तुमची फसवणूक किंवा तुमच्याविरोधात षड्यंत्र रचलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत किंवा कायदेशीर कागदपत्रं तयार करण्यावर भर द्या.
  • शुभ रंग - हिरवा (Green)
  • शुभ दिन - शनिवार
  • शुभ अंक - ६
  • दान - प्राण्यांना हिरव्या पालेभाज्या दान करा.

#नंबर १०

  • (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ९,१८,२७ तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
  • आजचा दिवस अध्यात्म आणि आत्मसंशोधनाचा आहे. गोंधळलेल्या मनस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी एखादा जुना गुरू भेटू शकतो.
  • शुभ रंग - लाल
  • शुभ दिन - मंगळवार
  • शुभ अंक - ६
  • दान - गरजूंना लाल रंगाचा मुळा आणि त्याची पानं दान करा.


२१ मार्च रोजी जन्मलेल्या सुप्रसिद्ध व्यक्ती
राणी मुखर्जी (Rani Mukherjee), अभिनेत्री शोभना (Shobhana), उस्ताद बिस्मिल्ला खान (Ustad Busmillah Khan), बुटा सिंग (Buta Singh).

Web Title: 21 march day according to numerology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.