33 Crore Gods: ३३ कोटी देव खरंच असतात का? ‘ही’ आहेत नावे; काही अद्भूत तथ्ये, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:13 AM2022-11-19T11:13:02+5:302022-11-19T11:14:32+5:30

33 Koti Devta: ईश्वर अनंत आहे. तो अनंत रूपांतून व्यक्त होतो, असे सांगितले जाते. ३३ कोटी देवता, महत्त्व, मान्यता आणि काही तथ्ये यांविषयी जाणून घ्या...

33 crore gods meaning know about what are the names of 33 crore devi devta and mythological facts and significance | 33 Crore Gods: ३३ कोटी देव खरंच असतात का? ‘ही’ आहेत नावे; काही अद्भूत तथ्ये, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या

33 Crore Gods: ३३ कोटी देव खरंच असतात का? ‘ही’ आहेत नावे; काही अद्भूत तथ्ये, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या

googlenewsNext

33 Crore Devi Devta: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. काही मान्यता शतकानुशतके पुढील पिढीपर्यंत जात आहेत. भारतीय संस्कृतीत परंपरा, चालिरिती, कुळाचार, कुळधर्म यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतात हजारो मंदिरे आढळून येतात. श्रद्धेनुसार आपल्या आराध्याचे पूजन, नामस्मरण केले जाते. वर्षभरात विविध प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जात असतात. यामध्ये देवता, त्यांचे अवतार यांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पंचमहाभूतांचेही पूजन केले जाते. भारतात गायीला देवाचे स्थान देण्यात आले आहे. कामधेनु गोमातेचे पूजन केले जाते. गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असल्याची समजूत अगदी प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसून येते. खरेच ३३ (33 Koti Dev) कोटी देवता आहे का? ३३ कोटी देवतांची नावे काय? ३३ कोटी देवता, महत्त्व, मान्यता आणि काही तथ्ये यांविषयी जाणून घेऊया...

भारतीय संस्कृतीत ब्रह्मा, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती या पंचदेवता मानल्या गेल्या आहेत. ब्रह्मदेवांनी सृष्टिची निर्मिती केल्याचे मानले जाते. तसेच श्रीविष्णू सृष्टिचे पालनहार आहेत, अशी समजूत आहे. तर महादेव शिवशंकर हे सृष्टिच्या लय तत्त्वाचे स्वामी मानले जातात. शक्ती हे देवीचे स्वरुप मानले गेले आहे. गणपती हे मूळ स्वरुप मानले गेले आहे. काही ठिकाणी सूर्याचा या पंचदेवतांमध्ये समावेश करण्यात येतो. भगवान, परमात्मा किंवा ईश्वर या तीन्हींचाही अर्थक एकच. तरीही शास्त्रांमध्ये देवी देवतांची अनेक रूपे सांगण्यात आली आहेत. (33 Koti Devi Devta)

३३ कोटी देवता एक संकल्पना

मात्र, ३३ कोटी देवता ही संकल्पना आहे. ३३ कोटी ही संख्या नाही. कोटी हा शब्द या ठिकाणी प्रकार या अर्थाने घेण्यात आलेला आहे. संस्कृत भाषेत 'कोटी' या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. त्यामुळे आपल्याकडे ३३ कोटी ही देवतांची संख्या नसून, त्याचे प्रकार आहेत, असे सांगितले जाते. या ३३ कोटी देवतांचा उल्लेख काही प्राचीन ग्रथांमध्ये आढळून येतो. महाभारतात आणि हरिवंश यांसारख्या प्राचीन ग्रंथात या ३३ कोटी देवतांसंदर्भातील काही उल्लेख आल्याचे पाहायला मिळते. 

३३ कोटी देवतांची नावे काय? 

३३ कोटी देवतांकडे या संपूर्ण सृष्टिचे व्यवस्थापन असल्याची मान्यता आहे. या ३३ कोटी देवतांमध्ये ८ वसू, ११ रूद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती आहेत. या प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे आहे. प्रत्येकाचा कार्यभार वेगळा असल्यामुळे याला कोटी म्हटले गेले आहे, असे सांगितले जाते. कोटी हा शब्द विशेषणात्मक आहे संख्यावाचक नव्हे.

- बारा आदित्यांची नावे : अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू.

- अकरा रुद्रांची नावे : मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.

- अष्टवसूंची नावे : आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास.

 - एक इंद्र.

- एक प्रजापती.

- असे एकूण : ८+११+१२+१+१ = ३३.

काही शास्त्रांमध्ये इंद्र आणि प्रजापतीच्या जागी दोन अश्विनीकुमारांना ३३ कोटी देवतांमध्ये स्थान देण्यात आले आहे. सृष्टिचे व्यवस्थापन करण्यासाठी सदर देवतांकडे कार्यभार सोपवण्यात आल्याचे सांगितले जाते. ईश्वर वेगवेगळ्या रूपांतून व्यक्त होतो, असा एक मूलभूत सिद्धांत आहे. ३३ कोटी देवता या संकल्पनेबाबत काही मतमतांतरे असल्याचे आढळून येते. ३३ कोटी देवतांशिवाय सृष्टिचे कार्य करण्यासाठी अन्य देवता कार्यरत असल्याचे सांगितले जाते. अनेकविध मते असली, तरी ३३ कोटी ही संख्या नसून, ते प्रकार आहेत, यावर सर्वांचे एकमत असल्याचे पाहायला मिळते हे निश्चित. ईश्वर अनंत आहे. तो अनंत रूपांतून व्यक्त होतो, असा विशाल भाव मांडण्यात आल्याचे पाहायला मिळते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 33 crore gods meaning know about what are the names of 33 crore devi devta and mythological facts and significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.