बाळाचा पहिला दात घडवतो त्याचे आणि कुटुंबियांचे भविष्य; सामुद्रिक शास्त्राने दिलेत शुभाशुभ संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 05:16 PM2022-08-22T17:16:19+5:302022-08-22T17:16:38+5:30

बाळाला दात येणे हे त्याच्या वाढीचे लक्षण असले तरीदेखील काही गोष्टी शुभ अशुभ परिणामांचे संकेत देतात, ते कोणते व त्यावर उपाय काय ते जाणून घ्या!

A baby's first tooth shapes his and his family's future; Auspicious signs given by the science of oceanography! | बाळाचा पहिला दात घडवतो त्याचे आणि कुटुंबियांचे भविष्य; सामुद्रिक शास्त्राने दिलेत शुभाशुभ संकेत!

बाळाचा पहिला दात घडवतो त्याचे आणि कुटुंबियांचे भविष्य; सामुद्रिक शास्त्राने दिलेत शुभाशुभ संकेत!

googlenewsNext

मुलांना चालणे, बसणे, खाणे, दातांची ठेवणं यावरून सामुद्रिक शास्त्राने भाकीत केले आहे. मुलांच्या वाढीत या प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्याचा विशिष्ट कालावधी असतो. त्या गोष्टी मागे पुढे झाल्या तरी क्रम बिघडतो आणि त्यानुसार घडणारे भाकीतही बदलते. मुलांच्या दाताच्या ठेवणीवरून सामुद्रिक शास्त्राने केलेले भाकीत जाणून घेऊ. 

बाळ सहा महिन्याचे झाले असता त्याला दात यायला सुरुवात होते. दात वेळेत यावेत, नेटके यावेत यासाठी औषधही दिले जाते. परंतु वेळेआधी आलेले दात बाळाला आणि त्याच्या नातेवाईकांना त्रासदायक ठरू शकतात!

जन्मापासून दात असणे

काही बाळांना जन्मापासूनच दात असतात. असे मानले जाते की अशा बाळाच्या पालकांना आरोग्याच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. बाळालाही अनेक शारीरिक तक्रारी उद्भवण्याचा संभव असतो. 

वरचे दात आधी येणे!

सहसा मुलांचे खालचे दात आधी येतात. पण काही बाळांना वरचे दात आधी येतात. तसे होणे आईच्या आरोग्यासाठी क्लेषदायी ठरू शकते. असे क्वचित घडते. त्यामुळे सामुद्रिक शास्त्राने अशा मुलांबद्दल निरीक्षण नोंदवले आहे. 

या महिन्यात दात येणे शुभ असते

ज्योतिषशास्त्रानुसार जन्माच्या पहिल्या महिन्यात दात येणे शुभ मानले जात नाही. यामुळे मुलांना त्यांच्या जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुसऱ्या महिन्यात, दात येणे देखील वेदनादायक असते. तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात दात येणे मुलाच्या पालकांसाठी शुभ नाही. पाचव्या महिन्यात आलेले दात मोठ्या भावासाठी शुभ नाहीत. याउलट वेळेवर म्हणजे सहाव्या महिन्यात आलेले दात शुभ मानले जातात. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते. पित्याचे भाग्य उजळते. 

काही बाळांना वर्षभर दात येत नाहीत. या गोष्टीची पालकांना काळजी वाटत असली तर सामुद्रिक शास्त्रानुसार ते शुभ संकेत मानले जातात. दात जेवढे उशिरा येतात बाळाला तेवढे दीर्घायुष्य लाभते आणि इतर बालकांच्या तुलनेत अशा बाळांचे नशीबही बलवत्तर असते असे म्हणतात. 

Web Title: A baby's first tooth shapes his and his family's future; Auspicious signs given by the science of oceanography!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.