ज्योतिष सांगतात, पंतप्रधान मोदी यांच्या कुंडलीत जुळून आला आहे 'हा' भाग्यकारक योग; म्हणूनच...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 03:23 PM2022-01-08T15:23:23+5:302022-01-08T15:24:00+5:30
ज्यांच्या कुंडलीत हा योग जुळून येतो ते जगावर राज्य करतात असे ज्योतिष शास्त्राचे भाकीत सांगते!
रुचक योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानला जातो. त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती बलवान, पराक्रमी, धैर्यवान आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहते. याशिवाय व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता जबरदस्त असते. या योगाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती क्रिकेटपटू, सैन्यातील अधिकारी, राजकारणी, मंत्री आणि विविध प्रकारच्या सुरक्षा सेवांमध्ये नाव कमावते.
कुंडलीत अनेक प्रकारचे योग नक्षत्र आणि ग्रहांवरून तयार होतात. त्यातील काही शुभ तर काही अशुभ परिणाम देतात. कुंडलीतील शुभ योगांमुळे प्रगती होते. तर अशुभ योगामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्या आणि संकटे येतात. तूर्तास आपण शुभ फळ देणाऱ्या रुचक योगाबद्दल जाणून घेऊ. कुंडलीत रुचक योग काय आहे आणि त्याचे कोणते फायदे होतात बघा.
रुचक योगाचे फायदे
ज्योतिष शास्त्रात रुचक योग शुभ मानला जातो. त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती बलवान, पराक्रमी, धैर्यवान आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहते. याशिवाय व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता जबरदस्त असते. या योगाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती क्रिकेटपटू, सैन्यातील अधिकारी, राजकारणी, मंत्री आणि विविध प्रकारच्या सुरक्षा सेवांमध्ये नाव कमावते. ग्रह स्थिती बदलत असते. त्यानुसार हे योग जुळत असतात. ज्योतिषांच्या मते सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुंडलीत रुचिक योग तयार झाला आहे. त्याचा प्रभाव आपण सगळेच जण पाहत आहोत.
रुचक योग जुळून आला हे कसे कळते?
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या पहिल्या घरात रुचक योग तयार झाला तर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या बलवान, पराक्रमी बनते. व्यवसायातही यश मिळते. याशिवाय वैवाहिक जीवनात खूप आनंद मिळतो. कुंडलीच्या चौथ्या आणि सातव्या घरात रुचक योग तयार झाला तर व्यक्तीला समाजात खूप प्रतिष्ठा मिळते. तसेच, जर कुंडलीच्या १० व्या घरात हा योग तयार झाला असेल तर त्या व्यक्तीला राजकारणी किंवा मंत्री म्हणून खूप प्रतिष्ठा मिळते. हे वाचल्यावर मोदीजींच्या कुंडलीच्या कितव्या घरात रुचक योग जुळून आला आहे हे तुम्ही सुद्धा सहज सांगू शकाल!
मात्र 'अशा' स्थितीत रुचक योग अशुभ फल देतो -
कुंडलीत मंगळ शुभ असेल तेव्हाच रुचक योग शुभ फल देतो. अन्यथा कुंडलीत मंगळ अशुभ स्थितीत असेल तर मांगलिक दोष निर्माण होतो. याउलट मंगळावर दोन किंवा अधिक अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर रुचक योग शुभ फळ देत नाही. याशिवाय कुंडलीत मांगलिक दोष, पितृदोष किंवा काल सर्प दोष असला तरीही हा योग शुभ परिणाम देत नाही. त्यामुळे व्यक्ती अनैतिक गोष्टी करू लागते.
रुचक योगाचे लाभ आणि तोटे वाचल्यावर तुम्हालाही आपल्या कुंडलीत हा योग कधी जुळून येणार याबद्दल उत्सुकता लागली असेल ना? यासाठी तुम्हाला ज्योतिषांचे मार्गदर्शन लागेल आणि जेव्हा हा योग जुळून येईल तेव्हा तुम्ही जगाला मार्गदर्शन करण्यास सक्षम व्हाल!