वास्तूशास्त्रानुसार घरात 'या' प्राण्यांच्या प्रतिमा ठेवणे ठरते लाभदायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 03:43 PM2021-06-05T15:43:55+5:302021-06-05T15:44:15+5:30

वास्तुशास्त्र संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आणि सुचवल्या जातात, परंतु वास्तू शास्त्राच्या सल्ल्यानुसार त्या वस्तूंचा वापरक करणे लाभदायक ठरते. 

According to Vastushastra, it is beneficial to keep images of 'these' animals in the house! | वास्तूशास्त्रानुसार घरात 'या' प्राण्यांच्या प्रतिमा ठेवणे ठरते लाभदायक!

वास्तूशास्त्रानुसार घरात 'या' प्राण्यांच्या प्रतिमा ठेवणे ठरते लाभदायक!

googlenewsNext

घरात अनेक प्रकारच्या मूर्ती असतात. काही विकत आणलेल्या तर काही भेटवस्तू म्हणून मिळालेल्या. त्या सर्वच वस्तू आपल्या वास्तूला लाभदायक ठरतातच असे नाही.  म्हणून वस्तूंची निवड डोळसपणे करणे गरजेचे आहे. विशेषतः तेव्हा, जेव्हा आपण त्या वास्तूला लाभदायक ठराव्यात म्हणून जाणीवपूर्वक खरेदी करतो! त्यामध्ये काही प्राण्यांच्या प्रतिमांचादेखील उल्लेख केला जातो. या प्रतिमा नेमक्या कोणाच्या असाव्यात, ते जाणून घेऊया. 

हत्तीचा पुतळा: आपण घरात हत्तीचा पुतळा ठेवू शकता. ही मूर्ती चांदीची, पितळ्याची किंवा लाकडाची असावी. हत्ती हे भरभराटीचे प्रतीक आहे. शयनगृहात हत्तीचा पितळी पुतळा ठेवल्याने पती-पत्नीमधील मतभेद संपुष्टात येतात आणि चांदीचा हत्ती ठेवल्यास राहूशी संबंधित सर्व दोष दूर होतात. कुंडलीत पाचव्या आणि बाराव्या स्थानावर बसलेल्या राहुचा विपरीत परिणाम होत असेल, तर त्यावर हा उपाय आहे. फेंगशुईच्या म्हणण्यानुसार, घरात हत्तीचा फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने धन उर्जा तसेच संपत्ती यात वाढ होते.

हंसाची मूर्तीः घरात अतिथी कक्षात दो हंसो का जोडा, अर्थात दोन हंसांची जोडी ठेवावी. त्यामुळे संपत्ती आणि धनधान्यात भरभराट होण्याची शक्यता वाढेल आणि घरात नेहमीच शांतता राहील. दोन हंसऐवजी आपण दोन बदक किंवा दोन करकोचे यांच्या जोडीचीदेखील प्रतिमा ठेवू शकता. यामुळे वैवाहिक जीवनात सुसंवाद राखला जातो.

कासव: फेंगशुईच्या मते घरात कासव घरात ठेवल्यामुळे प्रगतीबरोबरच संपत्ती आणि समृध्दीचा योग बनतो. पितळी किंवा तांब्याचे कासव घरात ठेवल्यास दीर्घ आयुष्य लाभते असाही अनेकांना अनुभव आहे. कासवाची प्रतिमा ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते. पात्रात पाणी भरून कासव ड्रॉईंग रूममध्ये ठेवता येईल. कासव लाकडाचा नसून धातूचा असावा एवढी काळजी घ्यावी. 

पोपट मूर्तीः वास्तुनुसार पोपटाची मूर्ती किंवा चित्र अभ्यास कक्षात किंवा मुलं जिथे अभ्यासाला बसतात तिथे ठेवली पाहिजेत. पिंजऱ्यात पोपट पाळू नये, त्यापेक्षा घरात राघू मैनेचे चित्र किंवा पुतळा ठेवणे फायद्याचे ठरते. वास्तु शास्त्राच्या मते, उत्तरेकडे पोपटाची छायाचित्रे ठेवल्यास मुलांमध्ये अभ्यासाची आवड वाढते, तसेच त्यांची स्मृती देखील वाढते.प्रेम, निष्ठा, दीर्घायुष्य आणि सौभाग्य यासाठी पोपटाची प्रतिमा लावली जाते. जर तुम्हाला घरात आजारपण, नैराश्य, दारिद्र्य जाणवत असेल तर घरात पोपटाची छायाचित्रे किंवा मूर्ती ठेवा. पती-पत्नीमध्ये प्रेमसंबंध स्थापित करण्यासाठी, फेंग शुईच्या मते पोपटांची जोडी देखील स्थापित केली जाते. फेंग शुईच्या म्हणण्यानुसार, पोपट चांगले नशीब आणते.

मत्स्यमूर्ती: बरेच लोक घरात मत्स्यालयात मासे ठेवतात. परंतु माशांना छोट्याशा जलाशयात कैद करण्याऐवजी पितळ किंवा चांदीची मूर्ती बनवणे आणि घरात ठेवणे चांगले. वास्तूशास्त्र आणि फेंग शुई या दोघांच्या म्हणण्यानुसार ही मूर्ती घरात सुख आणि शांती राखून प्रगतीचा मार्ग उघडते. चांगले आरोग्य, आनंद,समृद्धी, संपत्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. आपण ही मूर्ती आपल्या घराच्या ईशान्य किंवा पूर्वेकडील दिशेने ठेवू शकता.

गाय-वासराची मूर्ती: बर्‍याच घरांमध्ये कामधेनु गायीची पितळी मूर्ती ठेवलेली आढळते. ज्या घरात संतानप्राप्तीची अपेक्षा असते, तिथे गाय वासराची मूर्ती ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्याचा संतानप्राप्तीसाठी लाभ होतो आणि  मानसिक शांतीदेखील मिळते. त्याचे महत्त्व फेंग शुईमध्ये देखील सांगितले गेले आहे. अभ्यासामध्ये एकाग्रतेसाठी ही मूर्ती घरात स्थापित करा.

उंटांची मूर्ती: घरात उंटची मूर्ती ठेवण्याची प्रथा उंटाची आहे. उंटांच्या जोडीची मूर्ती ड्रॉईंग रूममध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये वायव्य दिशेच्या दिशेने ठेवली जाते. उंट हे कठोर परिश्रमांचे प्रतीक आहे. करियरच्या प्रगतीसाठी किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये उंटांचे पुतळे किंवा चित्र ठेवले जाते. ही मूर्ती आपले मन स्थिर ठेवून यश मिळवण्याचे संकेत देते. घरात ही मूर्ती ठेवणे कुंटुबस्वास्थाच्या दृष्टीने हितकारक ठरते. 

वास्तुशास्त्र संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आणि सुचवल्या जातात, परंतु वास्तू शास्त्राच्या सल्ल्यानुसार त्या वस्तूंचा वापरक करणे लाभदायक ठरते. 

Web Title: According to Vastushastra, it is beneficial to keep images of 'these' animals in the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.