ऋषी मुनींसारखे निरोगी दीर्घायुष्य मिळवणे आपल्या हातात आहे; त्यासाठी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:39 PM2022-03-09T14:39:52+5:302022-03-09T14:40:14+5:30

निरोगी, दीर्घायुष्य मिळावं ही सर्वांचीच अपेक्षा असते, मात्र त्यासाठी सोपा आणि बिनखर्चिक उपाय आपण करत नाही. त्याची सुरुवात करा.

Achieving longevity like a sage is in your hands; Do 'these' solution for that! | ऋषी मुनींसारखे निरोगी दीर्घायुष्य मिळवणे आपल्या हातात आहे; त्यासाठी करा 'हे' उपाय!

ऋषी मुनींसारखे निरोगी दीर्घायुष्य मिळवणे आपल्या हातात आहे; त्यासाठी करा 'हे' उपाय!

googlenewsNext

नैसर्गिक रित्या अहोरात्र म्हणजे २४ तासांत २१,६०० वेळा श्वासोच्छ्वास करतो. त्या श्वासोच्छ्वासातही शीतकाल उष्णकाल यांस अनुसरून डाव्या व उजव्या बाजूने विशिष्ट नैसर्गिक शास्त्रीय व्यवस्थेनुसारच श्वासोच्छ्वास होत असतो. ईश्वराने नाकाला दोन छिद्रे ठेवली आहेत. त्यामागे शास्त्रीय हेतू आहेत. एवढ्या मोठ्या मानवपिंडावर एक केससुद्धा अनावश्यक वा निर्हेतुक नाही. संपूर्ण प्राण ज्या श्वासप्रक्रियेवर अवलंबून आहे, तो श्वासोच्छ्वास ज्या नाकाने व्हावयाचा त्या नाकाची रचनाही ईश्वराने शास्त्रीय केली आहे. 

षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकविशति:
एतत्संख्यात्मकं मैत्रं जीवो जपति सर्वदा।

म्हणजेच दिवसभरात मानव २१,६०० वेळा `सोऽहम' शब्दाचा जप करत असतो, तितक्या वेळा त्याची श्वसनक्रिया होत असते. 
योगशास्त्रानुसार नाकाच्या डाव्या पुडीला सूर्य व उजवीला चंद्र असे नाव दिले गेले आहे. डाव्या नाकपुडीत इडा नाडी व उजव्या नाकपुडीत पिंगला नाडी आहे. सूर्य पुडीने श्वास घेतल्यास उष्णता व चंद्रनाडीने श्वास घेतल्यास थंडी फुप्फुसात प्रविष्ट हाटे. आज आपणास हे माहितीही नाही की कधी कोणत्या नाकपुडीने श्वास घ्यावा. परंतु आपले पूर्वज दिवसातून तीन वेळा या श्वसनप्रक्रियेची साधना करत असत. या श्वसनप्रक्रियेचे धार्मिक नाव `संध्या' असे आहे. संध्येत प्राणायाम हे मुख्य व परमलाभक असे तत्त्व आहे. या श्वस क्रियेच्या साधनेत आयुष्यवृद्धि होते व ही साधना आपल्या हातात आहे. 

ऋषयो दीर्घसन्ध्यात्वात दीर्घमायुरवाप्नुयु:।

हे मनूचे वचन वर आलेच आहे. ऋषींच्या दीर्घायुष्याचे रहस्य संध्येतच आहे, असा या वचनाचा आशय आहे.
योग शास्त्राने प्राणायामाचा व श्वासप्रक्रियेचा खोल अभ्यास केला. ही श्वसनक्रिया निरनिराळ्या अवस्थेत निरनिराळी असते. 

स्थितस्य द्वादश श्वासाश्चलतोऽष्टादश स्मृता:।
चतुर्विशति सुप्तस्य, त्रिशद ग्राम्ययरतस्य च।।

मनुष्य बसला असता १२, चालताना १८, झोपलेला असताना २४, विषय सेवनाचे वेळी ३० असे दर मिनिटांच्या हिशोबात श्वास घेतो. 
याचा अर्था त्या त्या अवस्थेत श्वास अधिक प्रमाणात खर्ची पडतात. म्हणजेच तितक्या प्रमाणात मानवाचे आयुष्य अधिक झपाट्याने नष्ट होते. शरीराचे व्याप तर चालूच राहणार आणि हा आयुष्य नाशही असाच होत राहणार. तरीसुद्धा त्या अवस्थेत होणारा ऱ्हास टाळण्यासाठी श्वासांचा निरोध करून त्याची भरपाई करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर ही भरपाई करूनही मूळातील २१६०० श्वासातूनही काही वाचवले तर अधिक चांगले. यासाठीच श्वासनिरोधरूप `प्राणायाम' त्यावर उत्तम उपाय म्हणून शास्त्रकारांनी आपल्यापुढे ठेवला आहे. 

ईश्वराने दिलेली श्वाससंख्या म्हणजे आयष्य. दिलेली श्वास संख्या प्राणायामाने दीर्घकाळ वापरता येते. आयुष्य वाढवणे आपल्या हाती आहे.

Web Title: Achieving longevity like a sage is in your hands; Do 'these' solution for that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.