Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (उत्तरार्ध)

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 10, 2020 07:30 AM2020-10-10T07:30:00+5:302020-10-10T07:30:02+5:30

Adhik Maas 2020: शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरतीदेखील अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून दुसरे चांगले औचित्य कोणते!

Adhik Maas 2020: om jay jagdish hare! | Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (उत्तरार्ध)

Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (उत्तरार्ध)

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ

आरती म्हणजे आर्तता. आरती म्हणजे प्रार्थना. आरती म्हणजे संवाद. तोही कोणाशी? तर प्रत्यक्ष देवाशी. ती समजून उमजून म्हटली, तर आपला आनंद द्विगुणित होता़े  मात्र, आपण सूर-तालात एवढे रंगून जातो, की आपले आरतीच्या भावार्थाकडे लक्षच जात नाही. मराठीतील अनेक आरत्या आपल्याला तोंडपाठ आहेत. तशीच हिंदी भाषेतील शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरतीदेखील अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. ती म्हणत असताना, आपण थेट देवाशी बोलत आहोत की काय, असा भास होतो. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून दुसरे चांगले औचित्य कोणते...आरतीचा पूर्वार्ध आपण काल पाहिला, आज त्याचा उत्तरार्ध!

हेही वाचा: Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (पूर्वार्ध)

तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति,
किस विधी मिलू दयामय, तुमको में कुमति।।

भगवंता, गीतेत तूच अर्जुनाला सांगितले आहेस, 'अहं वैश्वानरो भूत्वा, प्राणिनाम् देहमाश्रिता' अर्थात, तू सर्वव्यापी सामावलेला आहेस आणि सर्व प्राणिमात्र, हे तुझेच सगुण रूप आहे. त्यांचे पालन करणारा, तू प्राणपति आहेस. फक्त तुला पाहण्याची दृष्टी माझ्याजवळ नाही. म्हणून मी मठात, मंदिरात, निसर्गात, सर्वत्र तुझा शोध घेत, फिरत आहे. मात्र, कविवर्य सुधीर मोघे म्हणतात त्याप्रमाणे, 'मंदिरत अंतरात, तोच नांदताहे, नाना देही, नाना रूपी, तुझा देव आहे...' मात्र, माझ्या कुमतिला म्हणजेच जडबुद्धी असणाऱ्या भक्ताला तू दिसत नाहीस, तुला पाहण्याची दृष्टी दे.

दीन बंधु, दु:ख हर्ता, ठाकूर तुम मेरे,
अपने हाथ उठाओ, द्वार पडा तेरे।।

लहान बाळासाठी त्याची आई, हीच त्याचे सर्वस्व असते. त्याला कोणत्या वेळी काय हवे, नको ते ती पाहते. न मागता, न सांगता देते. मायेने काळजी घेते, सांभाळते. आपल्या मायेची सावली बाळावर धरते. तसा भगवंतही आपल्या भक्तावर कृपेची सावली ठेवतो. जो प्रयत्नवादी आहे, त्याला हात देतो. दु:ख दूर करतो. मात्र, कधी कधी तो कामात एवढा व्यस्त असतो, की बाळासारखे धाय मोकलून रडल्याशिवाय, पोटतिडकिने हाक मारल्याशिवाय जवळच घेत नाही. भगवंताला विश्वाचा पसारा सांभाळायचा आहे, याची भक्ताला जाणीव असते, परंतु भक्तासाठी तोच सर्वस्व आहे. त्याने साथ सोडून कसे बरे चालेल? 

विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा,
श्रद्धा भक्ति बढाओ, संतन की सेवा।।

यावरून महाभारतातला किस्सा आठवतो. माता कुंतीने भगवान श्रीकृष्णाला सांगितले, 'भगवंता, मला द्यायचेच असेल, तर खूप दु:ख दे. जेणेकरून मला सतत तुझा आठव राहील.' किती यथार्थ मागणे आहे हे! संकटकाळी भगवंताची आठवण होणे, हा मनुष्यस्वभावच आहे. म्हणून शिवानंद स्वामी शेवटच्या कडव्यात म्हणतात, 'विषय, विकार मिटाओ, पाप हरो देवा' आम्ही विषयांत एवढे अडकले आहोत, की तुझा आम्हाला विसर पडतो. आम्ही कशासाठी जन्माला आलो आहोत, हे उद्दिष्ट विसरतो. समाजसेवा, संतसेवा, देशसेवा या कारणी देह झिजवायचा सोडून विषयांमध्ये अडकून आयुष्य संपवतो. म्हणून आमची श्रद्धा, भक्ती, आत्मविश्वास, बंधूभाव, भूतदया तुलाच वाढवायची आहे. ते तू नक्की करशील, याची खात्री आहे, म्हणून ही आरती गात आहे.
ओम जय जगदिश हरे!

हेही वाचा : Adhik Maas 2020: अधिक मासात कोणता जप, कसा आणि किती करावा?

Web Title: Adhik Maas 2020: om jay jagdish hare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.