Adhik Maas 2023: 'आजीच्या हाती, नानाविध वाती' अधिक मासानिमित्त जाणून घ्या आपला समृद्ध वारसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 03:21 PM2023-07-17T15:21:39+5:302023-07-17T15:23:02+5:30

Adhik Maas 2023: दिवा लावताना तेल, तुपाबरोबर महत्त्वाची असते ती म्हणजे वात, तिचे नानाविध प्रकार आणि नावे वाचून थक्क व्हाल!

Adhik Maas 2023: Learn more about lamp thread verity which shows our rich heritage on the occasion of Adhik Maas! | Adhik Maas 2023: 'आजीच्या हाती, नानाविध वाती' अधिक मासानिमित्त जाणून घ्या आपला समृद्ध वारसा!

Adhik Maas 2023: 'आजीच्या हाती, नानाविध वाती' अधिक मासानिमित्त जाणून घ्या आपला समृद्ध वारसा!

googlenewsNext

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. एका छताखाली दोन तीन पिढ्याच नव्हे तर दोन तीन कुटुंबही आनंदात नांदायची. घरात एवढी मंडळी असूनही प्रत्येकाच्या हाताला काम असे. कोणी रिकामे बसून राहत नसे. ही कामे बळजबरीने नाही तर स्वेच्छेने निवडलेली असायची. पैकी आजीबाईंच्या वाट्याला येणारे काम म्हणजे दिव्याच्या वाती करणे. कथा कीर्तन ऐकायला जाताना आजी कापसाचा पुंजका घेऊन जात असत आणि कथा ऐकता ऐकता सुबक सुंदर वाती बनवत असत. आपल्याला माहित असलेल्या वाती फार तर चार ते पाच प्रकारांच्या, पण पूर्वी वातीचेच अनेक प्रकार केले जात असत. दीप अमावस्येनिमित्त सोशल मीडियावर अशाच वातींची फोटो व नावासकट माहिती मिळाली. ती पुढे देत आहे. या अधिक मासात आपणही मागच्या पिढीकडून त्यापैकी जमतील तशी वात करण्याचा प्रयत्न करू आणि आपला हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करू. 

अधिकमासाच्या वाती

डावीकडून उजवीकडे

1. चक्र वाती
2. वृंदावन वाती
3. गोपुर वाती
4. 365 धागाच्या वाती
5. नवरत्न वाती
6. रुद्राक्ष बाती
7. लक्षदीप वाती
8. कार्तिक मास 210 धाग्याच्या वाती
9. पाच धाग्याच्या 
बिल्वपत्र वाहती
10. 108 धाग्याच्या वाती 

11. बिल्ले वाती
12. 10 धाग्याच्या वाती
13.  3 धाग्याच्या वाती
14.  कार्तिक मास 30 धाग्याच्या वाती
15. संकष्टी चतुर्थीच्या वाती
16. लक्ष्मी वाती
17. 3 कळ्याच्या वाती
18. 221 धाग्याच्या वाती
19. अष्टदल लक्ष्मी वाती
20. 5 धाग्याच्या लक्ष्मी  वाती
21. गदा वाती ( हनुमान )
22. मोग्गु वाती
23. कुच्चु वाती
24. 110 धाग्याच्या वाती
25. 50 धाग्याच्या वाती
26. अवळा वाती
27. डमरू वाती
28. 500 धाग्याच्या वाती
29. वेणी वाती
30. काडी वाती
31. मंगलारुती वाती
32. कट्ट वाती
33. फुल वाती.

ही माहिती वाचून पूर्वजांच्या धार्मिकतेवर, भक्तीवर व कुशलतेवर नतमस्तक झाल्याशिवाय रहाणार नाही. अभिमानास्पद!

Web Title: Adhik Maas 2023: Learn more about lamp thread verity which shows our rich heritage on the occasion of Adhik Maas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.