Adhik Maas 2023: आज अधिक मासातला शेवटचा सोमवार, शिवरात्री आणि चार अद्भुत संयोग; नक्की करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:29 AM2023-08-14T09:29:16+5:302023-08-14T09:29:45+5:30

Adhik Maas 2023: आज अधिक मासातल्या शेवटच्या सोमवारी मासिक शिवरात्री बरोबरच अतिशय शुभ संयोग घडत असल्याने आज केलेल्या उपासनेचे दुप्पट फळ मिळेल.

Adhik Maas 2023: Today is the last Monday of Adhik Maas, Shivratri and four wonderful conjunctions; Make sure to do 'this' solution! | Adhik Maas 2023: आज अधिक मासातला शेवटचा सोमवार, शिवरात्री आणि चार अद्भुत संयोग; नक्की करा 'हे' उपाय!

Adhik Maas 2023: आज अधिक मासातला शेवटचा सोमवार, शिवरात्री आणि चार अद्भुत संयोग; नक्की करा 'हे' उपाय!

googlenewsNext

यंदा आलेला अधिक श्रावण मास १६ ऑगस्टला संपेल आणि त्यानंतर निज श्रावण किंवा नेहमीचा श्रावण महिना सुरू होईल, जो १५ सप्टेंबर रोजी संपेल. या कालावधीत २१, २८ ऑगस्ट आणि ४, ११ सप्टेंबर रोजी श्रावण सोमवार शिव आराधनेसाठी मिळणार आहे. वास्तविक पाहता पूर्ण श्रावण मासच शिवपूजेसाठी समर्पित आहे. पण अधिकाचे अधिक फळ मिळावे म्हणून आजच्या अधिक मासातल्या (Adhik Maas 2023)सोमवारी शिवपूजेची संधी दवडू नका. कारण आज मासिक शिवरात्री बरोबरच अतिशय शुभ संयोग घडत असल्याने आज केलेल्या उपासनेचे दुप्पट फळ मिळेल.

अधिक मास, सोमवार आणि मासिक शिवरात्रीचा योगायोग

आज सोमवारी, अधिकामाची शिवरात्रीही साजरी केली जात आहे. यामुळे आज पाळलेल्या व्रताचे फळ दुप्पट होईल. यासोबतच पूजेचे दुप्पट फळ मिळेल. याशिवाय, सर्वार्थ सिद्धी योग, सिद्धी योग आणि पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग आहे. अनेक शुभ योगांचा योगायोग असणे हे विशेष आहे.

पूजेचा शुभ मुहूर्त

तसे, अनेक शुभ योगायोगांमुळे, आजच्या सोमवारी पूजा आणि जलाभिषेक केल्याचे शुभ परिणाम दिवसभरासाठीच मिळतील. परंतु अधिकामास शिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त रात्रीचा असेल. आज, निशिता काल पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त रात्री १२.०२ ते १२. ४८ पर्यंत असेल. या काळात पूर्ण भक्तीभावाने केलेली पूजा प्रत्येक मनोकामना पूर्ण करेल.

सर्वार्थ सिद्धी योग: १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०७  ते ५.५० 
सिद्धी योग: सकाळपासून दुपारी ४.४० पर्यंत
पुनर्वसु नक्षत्र: सूर्योदय ते सकाळी ११. ०७ पर्यंत 
पुष्य नक्षत्र: १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०७ ते दुपारी १:५९
भद्रा काळ: सकाळी १०. २५ ते रात्री ११.३२ पर्यंत असेल. या भद्राचा वास पृथ्वीवर असल्याने या काळात शिवाराधना करावी. 

कशी करावी पूजा?

शिव उपासना भक्तिभावाने करावी. शिवलिंगाला अभिषेक घालताना नाग व नंदी बाजूला ठेवावेत. त्यांची स्वतंत्र पूजा करावी आणि एका पेल्यात पाणी घेऊन पळी पळीने ते संपेपर्यंत निदान १०८ वेळा ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावर जलाभिषेक करावा. अभिषेक पूर्ण झाल्यावर शिवलिंगाला धूप, दीप, दूध साखरेचा नैवेद्य दाखवून बेलाचे पान आणि पांढरे किंवा लाल फुल अर्पण करावे. 

Web Title: Adhik Maas 2023: Today is the last Monday of Adhik Maas, Shivratri and four wonderful conjunctions; Make sure to do 'this' solution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.