Adhik Maas 2023: अधिक मासात ३३नाही तर तीस तीन गोष्टींना, संकल्पांना महत्त्व का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 04:14 PM2023-07-08T16:14:58+5:302023-07-08T16:15:28+5:30

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून १६ ऑगस्ट पर्यंत यंदा अधिक श्रावण मास असणार आहे, या महिन्यात तीस तीन संख्येचे मोठे महत्त्व आहे; का व कसे ते जाणून घ्या!

Adhik Maas 2023: Why 33 things, resolutions matter in Adhik maas? Read on! | Adhik Maas 2023: अधिक मासात ३३नाही तर तीस तीन गोष्टींना, संकल्पांना महत्त्व का? वाचा!

Adhik Maas 2023: अधिक मासात ३३नाही तर तीस तीन गोष्टींना, संकल्पांना महत्त्व का? वाचा!

googlenewsNext

अधिक मासात तीस तीन या संख्येला खूप महत्त्व असते. अनेक जण अधिक मासानिमित्त ३३ जणांना वाण, ३३ जणांना भोजन, ३३ जोडप्यांसह सामुहिक पूजा, ३३ जणांना दान असे नानाविध संकल्प करून अधिक फलप्राप्ती करून घेतात. आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात काही करणे शक्य नसले, तरी सहज साध्य करता येतील असे काही संकल्प आहेत. ते ३३ संकल्प जाणून घेण्याआधी या संख्येमागील गणित समजावून घेऊ. 

तीस तीनच का?

चैत्रापासून फाल्गुनापर्यंत १२ महिन्यात ३५५ दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात. हे १० दिवस तीन वर्षांनी ३० दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात. म्हणजे, दर ३३ महिन्यांनी 'अधिक मास' येतो. म्हणून या महिन्यात सगळ्या गोष्टी तीस तीन या पटीत करतात.

३३ सकारात्मक संकल्प!

संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील. समाज माध्यमांवर एक छान मेसेज वाचला. त्यात हे ३३ संकल्प सुचवले होते. `जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्याशी सांगावे, सूज्ञ करून सोडावे सकळ जन', या उक्तीप्रमाणे ते संकल्प लेखाच्या माध्यमातून देत आहे.

१) सदाचार २) सद्भावना ३) समयसूचकता
४) समयपालन ५) समंजसपणा ६) सात्त्विकता
७) सहजता (वागण्या-बोलण्यात) ८)सौजन्य
९) स्नेहभाव १०) स्वयंशिस्त ११) स्वाभिमान
१२) सौम्यपणा १३) सुदृढता (शारीरिक व मानसिक)
१४) सत्यवादित्व १५) संकल्प १६) संयम
१७) स्मितहास्य १८) सदसद्विवेक १९) सत्संगती
२०) समर्पणभाव २१) सरळपणा २२) सौंदर्यदृष्टी
२३) सेवाभाव २४) सखोलज्ञान (विशेषत: आपल्या क्षेत्रात)
२५) सरसत्व २६) सातत्य २७) समाधान
२८) स्वावलंबन २९) सजगता ३०) सुसंस्कार
३१) सहनशीलता ३२) सकारात्मकता ३३) सद्गुरुसेवा

या सकारात्मक गोष्टी आत्मसात होण्यासाठी वेळ लागेल, परंतु अधिक मासाच्या मुहूर्तावर आपल्याला प्रयत्नांची सुरुवात नक्कीच करता येईल. 'अधिकस्य अधिकं फलम्' मिळवायचे असेल, तर अधिक मेहनत लागणारच ना?

तीस तीन गोपद्म रांगोळी

अधिक मासात (Adhik Maas 2023) कोणत्याही दिवशी किंवा सलग महिनाभर ७,६,५,५,४,३,२,१ अशी गोपद्मांची चढत्या क्रमाने रांगोळी काढतात. इथेही तीस तीन संख्या आलीच. वास्तविक पाहता, संपूर्ण चातुर्मासात तीस तीन गोपद्मांची रांगोळी काढण्याची प्रथा आहे. त्याला गोपद्म व्रत असेही म्हणतात. गोपद्म हे चिन्ह रांगोळीत शुभ मानले जाते. गो पद्म अर्थात गायीच्या पावलांचा ठसा. त्याचे प्रतिकात्मक रूप रांगोळीत काढतात. भगवान महाविष्णूंना गाय अतिशय प्रिय आहे. कृष्णावतारात तर ते 'गोपाल' झाले होते. जे त्यांना प्रिय, तेच त्यांना समर्पण करण्याची भावना भाविकांच्या ठायी असते. तिच तीस तीन गोपद्म चातुर्मासात किंवा अधिक मासात देवघरासमोरील पाटावर साकारली जातात.

Web Title: Adhik Maas 2023: Why 33 things, resolutions matter in Adhik maas? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.