ऐलमा पैलमा गणेश देवा... म्हणत वॉशिंग्टनमध्ये रंगला भोंडला; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 06:14 PM2022-10-13T18:14:28+5:302022-10-13T18:14:51+5:30

मराठी माणसांबरोबर मराठी संस्कृती साता समुद्रापार पोहोचली आणि वृद्धिंगतही झाली, त्याचेच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत रंगलेला भोंडला!

Ailma Pailama Ganesh Deva... Bhondla played in Washington's Maharashtra Mandal; Read on! | ऐलमा पैलमा गणेश देवा... म्हणत वॉशिंग्टनमध्ये रंगला भोंडला; सविस्तर वाचा!

ऐलमा पैलमा गणेश देवा... म्हणत वॉशिंग्टनमध्ये रंगला भोंडला; सविस्तर वाचा!

Next

नवरात्रीमध्ये घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दररोज संध्याकाळी सर्व वयोगटातील बायका मुलींना एकत्र आणणारा खेळ म्हणजे भोंडला. महाराष्ट्रमध्ये काही ठिकाणी यालाच हादगा तर काही ठिकाणी भुलाबाई म्हणतात. नवरात्रामध्ये हस्त नक्षत्र चालूअसते आणि हत्तीच्या सोंडेने जसे पाणी पडते त्याप्रमाणे धो धो पाऊस या दिवसांमध्ये पडतॊ म्हणून भोंडल्या दरम्यान हत्तीची पूजा होते.

आपली परंपरा जपत वॉशिंग्टन डी. सी. मेट्रो एरिया अमेरिका येथील श्री देवी कट्टा, मेरीलँड इथे भोंडला आयोजित केला होता.स्री देवी कट्टा हा मराठी महिलांना एकत्र आणणारा आणि एकमेकींना घट्ट जोडून ठेवणारा दुवा आहे.मराठी महिलांच्या विचारांच्या आदान-प्रदानातून सहयोग साधण्याचा प्रयत्न. थोडक्यात सांगायचं, तर अमेरिकेत-परदेशात राहणाऱ्या मराठी महिलांसाठी कौटुंबिक आणि व्यावसायि क जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या उपयुक्त गोष्टी, साधने, त्या संदर्भात लागणारी माहिती, असलेल्या शंका कुशंका यांचे निरसन, इत्यादी याचे मार्गदर्शन या महिला विशेष डिजिटल कट्ट्यावर केले जाते. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून वॉशिंग्टन डी. सी. मेट्रो एरियामधील मराठी मुली महिला मोठ्या प्रमाणात या भोंडल्यामध्ये सामील झाल्या होत्या. हा कार्यक्रम साईबाबा मंदिर, मेरीलँड येथे नियोजित करण्यात आला.

घटस्थापनेपासून सुरु झालेल्या भोंडल्यांमध्ये रोज नवीन नवीन गाणी म्हणत कोजागिरी पौर्णिमे पर्यन्त १६ पेक्षा जास्त गाणी म्हणायला सगळ्याजणी सगळ्या तयार असतात. स्त्री देवी कट्टा मधील मराठी साज लेवून नटून थाटून आलेल्या उत्साही तरुणींनी 
‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करी तुझी सेवा ........’ 
' एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलू…..'
' कारल्याचा वेल….'
' आड बाई अडोणी…. आमचा भोंडला संपला…
अशी १६ हुन अधिक गाणी म्हणून भोंडल्याचा आनंद घेतला. भोंडला म्हटलं की शेवटी खिरापत ओळखणे हा अतिशय गमतीदार भाग आलाच. कार्यक्रमामध्ये बाळगोपालांनी चतुरपणे समोसा, कपकेक, बटाटेवडा, दडपेपोहे, भेळ असेपदार्थ ओळखले. कमळ फुलाचेकाप, अळीव लाडू आणि रव्याचा केक असे ओळखायला थोडे कठीण पदार्थही महिलांनी ओळखले.अतिशय रुचकर खिरापतीचा सगळ्यांनी पोटभरून आनंद घेतला. कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी भोंडला असल्याने मस्त आटवलेले आणि खूप सारा सुकामेवा असलेले केशरयुक्त दूध म्हणजे उपस्थितांसाठी पर्वणीच होती.

स्त्री देवी कट्टा मेरीलँड येथे सातत्याने नवीन नवीन उपक्रम आणि कार्यक्रम होऊ घातलेआहेत. यावर्षी ही १) मराठी नाटक - अश्रूंची झाली फुले- कलाकारांबरोबर गप्पा गोष्टी कार्यक्रम २) कट्टा मीठा बोल - मराठी कलाकार प्राजक्ता माळी मुलाखत आणि गप्पा ३) झंकार Where east meets west - श्रुती भावे यांचा व्हायोलिन कार्यक्रम ४) स्री देवी कट्टा वार्षि क सहल ५) क्लासिक अन्वाइन्ड - Classic Unwind - गाण्याचा कार्यक्रम ५) भोंडला असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आता दिवाळी आणि खूप सारे परंपरा जपणारे उपक्रम नियोजित केलेलेआहेत.

सातासमुद्रापार राहणाऱ्या मराठी महिला आणि कुटुंबीयांसाठी हे सर्व कार्यक्रम म्हणजे आपल्या संकृतीची अनुभूती आणि नवीन पिढीला आपल्या परंपरांची ओळख आहे. प्रिया जोशी यांनी २०१६ मध्ये अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मराठी महिलांना आपली संस्कृती परंपरांचा वारसा जपण्यास, पुढे नेण्यास आणि वृद्धिंगत करण्यासाठी स्त्री देवी कट्टा ची सुरवात केली. गेली ६ वर्ष हे काम अथकपणे सुरु आहे.  यंदाही भोंडल्याच्या निमित्ताने सगळ्यांनी अमेरिकेत राहून महाराष्ट्रीय सणाचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा आनंद लुटला. 

लेखिका- प्रणाली बाबर 
संपादिका- प्रिया जोशी 
९ ऑक्टोबर २०२२
वॉशिंग्टन डी. सी. मेट्रोएरिया, अमेरिका 

Web Title: Ailma Pailama Ganesh Deva... Bhondla played in Washington's Maharashtra Mandal; Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.