Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शक्य नाही? लक्ष्मी मातेला आकर्षून घेण्यासाठी करा 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:26 PM2022-04-26T12:26:52+5:302022-04-26T12:29:11+5:30

Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेला पुढील उपायांनी आकृष्ट करा लक्ष्मी माता आणि धनाची देवता कुबेर यांना!

Akshaya Tritiya 2022: Can't buy gold on Akshayya Tritiya ? Do 'these' things to attract lord Lakshmi! | Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शक्य नाही? लक्ष्मी मातेला आकर्षून घेण्यासाठी करा 'या' गोष्टी!

Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शक्य नाही? लक्ष्मी मातेला आकर्षून घेण्यासाठी करा 'या' गोष्टी!

googlenewsNext

अक्षय्य तृतीयेचा दिवस हा वर्षातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी मुहूर्त न काढताही लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन कार्याची सुरुवात, घर-गाडी खरेदी यासारखी शुभ कार्ये करता येतात. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. विशेषतः सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात, शुभ परिणाम देतात आणि त्यामध्ये वाढ होते. यावेळी ३ मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने आपल्याला सोन्याबरोबरच आणखी कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करता येईल हे जाणून घेऊ. 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते, परंतु सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सोने खरेदी करणे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल, तर अन्य काही गोष्टी देखील आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. या गोष्टींमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो.

शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी जव खरेदी करू शकता. जव खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखेच शुभ मानले जाते. हे जव भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा. नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तुमच्या घरातील धन-संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाईल.

देवीला कवड्यांची माळ आवडते. अक्षय्य तृतीयेला कवड्यांची माळ देवीला अर्पण करा. देवीची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी कवड्यांची माळ लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा. त्यामुळे आर्थिक चणचण भासत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

अक्षय्य तृतीयेला श्री यंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी विधिपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी. अक्षय्य तृतीयेचा दिवस घरामध्ये श्री यंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ आहे असे म्हणता येईल.

दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हा शंख घरात ठेवल्याने नेहमी सुख-समृद्धी येते. दक्षिणावर्ती शंखाची पूजास्थळी विधिवत स्थापना करा. लक्षात ठेवा पूजेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका.

तसेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रांगोळी बरोबरच दारात लक्ष्मीची पावले रेखाटा. त्या कुंकवाच्या पावलांकडे आकर्षित होऊन लक्ष्मी तुमच्या कुटुंबावर कायम कृपादृष्टी ठेवेल. 

Web Title: Akshaya Tritiya 2022: Can't buy gold on Akshayya Tritiya ? Do 'these' things to attract lord Lakshmi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.