Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:06 PM2024-04-29T16:06:52+5:302024-04-29T16:07:28+5:30
Akshaya Tritiya 2024: घरातली तुळस कोमेजली, म्हणून नवीन तुळस विकत घेण्याचा विचार करताय? अक्षय्य तृतीयेला तुळस लावा आणि मिळवा अनेक लाभ!
यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. एवढे, की साडेतीन मुहूर्तांमध्ये या मुहूर्ताचा समावेश केला आहे. अक्षय म्हणजे अनंत. या दिवशी केलेले सर्व कार्य शुभ सिद्ध होते. या दिवशी अबुझा मुहूर्त असतो. यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केव्हाही करता येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची यथोचित पूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे व्यक्तीचे सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढू शकते. जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो. या दिवशी तुळशीचे रोप लावणे अत्यंत फलदायी मानले जाते.
तुळशी ही हरिप्रिया अर्थात विष्णूंना प्रिय असते असे मानले जाते. त्याबरोबरच लक्ष्मी मातेलाही तुळशीचा हार घालून पूजा केली जाते. तुमच्या कडे रामा तुळस असो नाहीतर श्यामा, त्याचे गुणधर्म वेगवेगळे असले तरी ती विष्णू तथा लक्ष्मीला वाहिल्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळतो. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विष्णू, लक्ष्मी याबरोबरच तुळशीचे रोप घेऊन त्याची यथासांग पूजा करा आणि त्याची रुजवण करा. जाणून घ्या विधी आणि महत्त्वाचे नियम.
तुळशीचे रोप, माती, शेणखत, कुंडी, पाणी, दिवा, फुलं इ. साहित्य घ्या. पुढीलप्रमाणे पूजा विधी करा.
>>अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुळशीचे रोप कसे लावावे?
>>अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान, ध्यान आणि सूर्यदेवाची पूजा करावी. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा सुरू करा.
>>त्यानंतर भगवान विष्णूच्या मंत्रांच्या जपासह तुळशीचे रोप लावा. त्यानंतर तुळशीमातेची विधिवत पूजा करावी. हे फायदेशीर शकते, त्यामुळे आनंद आणि समृद्धी देखील येते.
>>"ओम श्री तुलसीदेवी नमः"- या मंत्राचा जप करा.
>>तुळशीमातेजवळ तुपाचा दिवा लावा आणि "ओम श्री तुलसीदेवी नमः" चा जप करा.
>>तुळशीचे रोप लावल्यानंतर हे लक्षात ठेवा की, तुळशीच्या रोपाला रोज पाणी द्यावे. यामुळे सुख-समृद्धी येते.