Amalaki Ekadashi 2023: आज आमलकी एकादशीनिमित्त धनप्राप्तीसाठी आणि भाग्योदयासाठी करा सोपे पण महत्त्वाचे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 02:25 PM2023-03-03T14:25:52+5:302023-03-03T14:26:36+5:30
Amalaki Ekadashi 2023: आजची तिथी खास आहे आणि ग्रहस्थितीचीही साथ आहे, त्यानिमित्ताने करा दिलेले उपाय!
ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने आज ३ मार्च रोजी आलेली आमलकी एकादशी महत्त्वाची आहे. आज ग्रहस्थिती अनुकूल असल्याने धनप्राप्ती आणि भाग्योदयासाठी केलेली उपासना फलद्रुप होऊ शकते असे ज्योतिषांचे सांगणे आहे. त्यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूजा कशी करावी व कोणते उपचार करावे ते जाणून घेऊ.
धनवृद्धीचा मिळेल आशीर्वाद
आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू-माता लक्ष्मी यांचे वास्तव्य असलेल्या आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. म्हणून तिला आमलकी एकादशी म्हणतात. आवळ्याच्या झाडावर त्या दोहोंचा वास असतो असे मानतात. त्यामुळे आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. घरात सुबत्ता नांदते. या दिवशी उपास केला जातो तसेच पुढील उपायही केले जातात.
>> आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना २१ ताज्या पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. पूजेनंतर त्यांना दुधाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा.
>> आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करून देवीला एक नारळ अर्पण करावा. पूजेनंतर हा नारळ किमान आठवडाभर पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीजवळ ठेवा, काही काळाने आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल.
>> आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळ्याचे सेवन करा. आवळ्याच्या झाडाच्या छायेत रोज प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य सुधारते.
>> विवाहित महिलांसाठी आमलकी एकादशी खूप खास आहे. जर काही कारणाने पती-पत्नीमध्ये वाद झाला असेल किंवा पतीला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर पत्नीने या दिवशी आवळा किंवा करवंदाच्या झाडाची पूजा करून झाडावर कापसाची सात वस्त्रे घालावीत तुपाचा दिवा लावावा.