Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशी हे भगवान विष्णूंचे व्रत; ते करता आले नाही तरी 'हे' स्तोत्र आवर्जून म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:05 PM2023-09-27T15:05:52+5:302023-09-27T15:08:26+5:30

Anant Chaturdarshi 2023: अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची सत्यनारायण पूजेसम एक पूजा असते, ती करणे शक्य नसेल तर हे स्तोत्र म्हणा!

Anant Chaturdashi 2023: Anant Chaturdashi is the fast of Anant i.e. Lord Vishnu; Even if you can't do it, say this hymn! | Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशी हे भगवान विष्णूंचे व्रत; ते करता आले नाही तरी 'हे' स्तोत्र आवर्जून म्हणा!

Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशी हे भगवान विष्णूंचे व्रत; ते करता आले नाही तरी 'हे' स्तोत्र आवर्जून म्हणा!

googlenewsNext

२८ सप्टेंबर रोजी अंनत चतुर्दशी आहे. यादिवशी भगवान विष्णू यांच्या अनंत अवताराची पूजा केली जाते. तशी पूजा करणे शक्य नसेल तर विष्णू स्तोत्र आवर्जून म्हणावे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तीभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. 

Anant Chaturdashi 2023: यश, कीर्ती आणि वैभव देणारे अनंत चतुर्दशीचे व्रत कसे आणि किती वर्ष करायचे ते जाणून घ्या!

विष्णुसहस्रनामाचा महाभारतातील उल्लेख : 

शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठीराने विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता, मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या दैवताचा जप केला, तर मनुष्य जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो?

त्यावर भीष्माचार्य म्हणाले, 'भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता, मनुष्य हरतऱ्हेच्या दु:खावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे. मन:शांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भिष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्णदेखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते. 

महाभारत रचैते महर्षी व्यास यांनीदेखील सांगितले आहे, की 'जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. 

जगद्गुरु शंकराचार्यदेखील या स्तोत्राला दुजोरा देताना म्हणतात,

>> भगवद्गीता आणि विष्णुसहस्रनामाचे पारायण करा.

>> भगवंताचे चिंतन करा.

>> सत्संग करा. 

>> दीनजनांना दान करा. 

Anant Chaturdashi 2023: पांडवांनीदेखील केले होते अनंत चतुर्दशीचे भाग्यदायी व्रत; त्यांना काय लाभ झाला?वाचा!

विष्णुसहस्रनामाचे फायदे : 

>> आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. 

>> गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. 

>> ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.

>> मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो. 

Web Title: Anant Chaturdashi 2023: Anant Chaturdashi is the fast of Anant i.e. Lord Vishnu; Even if you can't do it, say this hymn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.