Angarki Chaturthi 2021: कधी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी? पाहा, शुभ योग, महत्त्व आणि कथा

By देवेश फडके | Published: February 27, 2021 04:50 PM2021-02-27T16:50:04+5:302021-02-27T16:54:28+5:30

संपूर्ण वर्षभरात तीन गणेश जयंती साजऱ्या केल्या जातात. याशिवाय वरद चतुर्थी व्रत, दूर्वा गणपती व्रत, एकवीस दिवसांचे गणपती व्रत, कपर्दि विनायक व्रत, गणेश पार्थिव पूजाव्रत, गणेश चतुर्थी, वटगणेश व्रत, तिळी चतुर्थी व्रत, संकष्टहर चतुर्थी व्रत, अंगारक चतुर्थी व्रत, संकष्ट चतुर्थी व्रत अशी विविध व्रते केली जातात. (Angarki Sankashti Chaturthi 2021)

angarki chaturthi 2021 know about date time angarki sankashti chaturthi katha and significance | Angarki Chaturthi 2021: कधी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी? पाहा, शुभ योग, महत्त्व आणि कथा

Angarki Chaturthi 2021: कधी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी? पाहा, शुभ योग, महत्त्व आणि कथा

googlenewsNext

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ गणपती बाप्पा सर्व गुणांचा ईश आहे. गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच वातावरण एकदम आनंददायी, मंगलमय होते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. संपूर्ण वर्षभरात तीन गणेश जयंती साजऱ्या केल्या जातात. याशिवाय वरद चतुर्थी व्रत, दूर्वा गणपती व्रत, एकवीस दिवसांचे गणपती व्रत, कपर्दि विनायक व्रत, गणेश पार्थिव पूजाव्रत, गणेश चतुर्थी, वटगणेश व्रत, तिळी चतुर्थी व्रत, संकष्टहर चतुर्थी व्रत, अंगारक चतुर्थी व्रत, संकष्ट चतुर्थी व्रत अशी विविध व्रते केली जातात.  (Angarki Sankashti Chaturthi 2021)

प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी व्रतांमध्ये सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीस अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. याला अंगारिका किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी असेही म्हणण्याचा प्रघात आहे. सन २०२१ मध्ये मंगळवार, ०२ मार्च २०२१ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी रात्री ०९ वाजून ५१ मिनिटांनी चंद्रोदय आहे. तसेच ३१ मार्च २०२१ रोजीही संकष्ट चतुर्थी आहे. मार्च हा महिना अतिशय शुभ मानला जात असून, एकाच महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येत आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात असा शुभ योग जुळून आला होता. 

अंगारक संकष्ट चतुर्थी, महाशिवरात्री, होळी; 'हे' आहेत मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

अंगारक संकष्ट चतुर्थी कथा

मंगळवारी येणाऱ्या या चतुर्थी महत्त्व सांगणारी कथा गणेश पुराणातील उपासना खंडात सांगितली आहे. भारद्वाज मुनींना पृथ्वीपासून जास्वंदीच्या फुलासारखा लाल पुत्र झाला. त्याचे नाव भौम असे होते. योग्य समयी मुनींनी त्यास उपदेश करून गणेशाचा शुभ मंत्र दिला. त्याने एक हजार वर्षे कठोर तपश्चर्या केली. माघ वद्य चतुर्थीला मंगळवारी दशभुज गणपतीने त्यास दर्शन दिले. गणेशाने त्यास वर देताना म्हटले की, ही तिथी सर्व संकाटाचे हरण करणारी व व्रत करणाऱ्यास इष्टफल देणारी होईल. हे भौमा, तू देवांसह अमृत प्राशन करशील व जगामध्ये मंगल या नावाने प्रसिद्ध होशील. तुझा वर्ण लाल आहे व पृथ्वीपुत्र असल्याने तुला अंगारक असेही म्हणतील. अशा रीतीने भौमाने-मंगलाने-अंगारकाने केलेली संकष्ट चतुर्थी अंगारक चतुर्थी या नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला 'मंगलमूर्ती" असे नाव मिळाले, असे सांगितले जाते. 

अधिक महिन्यातील अंगारकी चतुर्थी 

अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते. ३३ महिन्यांत एक अधिक मास येतो, म्हणजे २१ वर्षात साधारणतः सात अधिक मास येतात; अधिक मासात मंगळवारी संकष्टी येण्याची शक्यता सातात एक, म्हणून साधारणपणे २१ वर्षात एकच अंगारकी अधिक मासात येते.

सन २०२१ मधील अंगारकी चतुर्थी (Angarki Chaturthi 2021 Dates)

मंगळवार, ०२ मार्च २०२१ - अंगारकी चतुर्थी

मंगळवार, २७ जुलै २०२१ - अंगारकी चतुर्थी

मंगळवार, २३ नोव्हेंबर २०२१ - अंगारकी चतुर्थी

Web Title: angarki chaturthi 2021 know about date time angarki sankashti chaturthi katha and significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.