कुंभ संक्रांतीचा १२ राशींवर असा पडेल प्रभाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 11:25 AM2021-02-08T11:25:37+5:302021-02-08T11:26:13+5:30
१२ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, त्याला कुंभ संक्रांत असे म्हणतात. सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो, त्या राशीचे भाग्य उजळून निघते. तसेच अन्य राशीही प्रकाशमान होतात. या स्थितीने नेमका काय परिणाम साध्य होतो, ते पाहूया.
मेष : कुंभ संक्रांतीच्या दरम्यान तुम्हाला अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतील. उद्योगाची भरभराट करण्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी अनुकूल काळ सुरू होत आहे. त्यासाठी सर्व तर्हेचे सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या.
वृषभ : या काळात आपल्याला अनेक मान सन्मान मिळतील. अधिकाराची पदे मिळतील. तसेच नेतृत्त्वाची संधी प्राप्त होईल. तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुम्ही आघाडीवर राहाल.
मिथुन : सूर्याच्या परिवर्तनामुळे या राशीतील लोकांना धन धान्याची प्राप्ती होईल. मान सन्मानाचे प्रसंग येतील. आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्त होईल.
कर्क : या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो. मात्र, त्याचवेळेस भूतकाळातील काही गुपित गोष्टी बाहेर येऊ शकतील. सावध राहावे. याकाळात तुम्हाला तुमच्या घरातील वडिलधाऱ्या मंडळींची काळजी घेतली पाहिजे.
सिंह : आरोग्य, व्यक्तिमत्त्व आणि नातेसंबंध यावर कुंभ संक्रांतीचा परिणाम दिसून येईल. परिस्थितीत सुधारणा होईल. त्यामुळे मनस्थितीदेखील सुधारेल.
कन्या : कोर्ट कचेरी संबंधित काही कामे असल्यास, त्या कामांना गती मिळेल. निकाल तुमच्या बाजूने लागेल. कामाच्या धावपळीत तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे.
तूळ : आपणासाठी हा काळ फारसा अनुकूल नाही. विशेषत: नातेसंबंधात आपण सबुरीने घेतले पाहिजे. छोट्या मोठ्या कुरबुरींमुळे नात्यात वितुष्ट निर्माण होऊ शकते.
वृश्चिक : तुमच्यासाठी हा उद्योगाच्या भरभराटीचा काळ असला, तरीदेखील दुसऱ्यांशी स्पर्धा करण्याच्या नादात प्रतिस्पध्र्याला कमी लेखू नका आणि स्वत:ला श्रेष्ठ समजू नका. ही वेळ कामावर लक्ष देण्याची आहे.
धनु : आपल्या सर्व स्थगित कामांना चालना मिळेल. समाजात मान सन्मान मिळेल. आपली प्रतिष्ठा उंचावेल. कुंभ संक्रांतीचा काळ आनंदात जाईल.
मकर : हा आपल्यासाठी अतिशय अनुकूल आहे. आपल्या कामात मन लावून परिश्रम घेतलेत, तर लवकरच धनलाभाचा योग घडू शकेल. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहील.
कुंभ : कुंभ संक्रांतीचा थेट परिणाम कुंभ राशीवर होणार असल्याने या राशीच्या जातकांमध्ये अनेक सकारात्मक परिणा आढळतील. आत्मविश्वास वाढेल. प्रगती होईल. कामात स्वत:ला झोकून द्याल. फक्त आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
मीन : नोकरदार वर्गासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. प्रगती करणारा आहे. मात्र उद्योजकांना फसवणुकीसारखे वाईट अनुभव येण्याची शक्यता आहे. त्यांनी सावध राहणे चांगले.