तुमची साडेसाती सुरू आहे? तर 'या' चुका टाळाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 06:06 PM2021-03-18T18:06:54+5:302021-03-18T18:07:54+5:30

शनी महाराज अतिशय शिस्तप्रिय आहेत. साडेसातीच्या काळात ते आपली परीक्षा घेतात. या काळात आपण आपले काम प्रामाणिकपणे करणे हेच महत्त्वाचे असते.

Are you going through sadesati? So avoid these mistakes! | तुमची साडेसाती सुरू आहे? तर 'या' चुका टाळाच!

तुमची साडेसाती सुरू आहे? तर 'या' चुका टाळाच!

googlenewsNext

सर्व ग्रहांमध्ये मनुष्य घाबरतो ते शनी ग्रहाला. कारण शनी महाराजांची अवकृपा झाली, तर कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याची आपल्याला भीती वाटत राहते. साडेसाती झालेल्यांना चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. या काळात कोणाचा उष्कर्ष होतो, तर कोणाला आयुष्यभराची शिकवण मिळते. साडेसाती देव दानवांनाही चुकलेली नाही, तर मानवाला तरी कशी चुकेल? या काळात आपण आपले काम प्रामाणिकपणे करणे हेच महत्त्वाचे असते. शनी महाराज आपली परीक्षा घेत असतात. त्यावेळी न डगमगता आपण तत्वाला धरून आचरण केले पाहिजे आणि या चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत. 

>> शनी महाराज अतिशय शिस्तप्रिय आहेत. त्यांना अभक्ष्य आणि अपेयपान करणारे लोक आवडत नाहीत. म्हणून मांसाहार आणि मदिरापान करू नये. तसेच कोणाला दुखावणे, वाईट बोलणे, दुष्कृत्य करणे टाळले पाहिजे. त्याची भयंकर शिक्षा आपल्याला मिळू शकते. कारण शनी महाराज आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतात. 

>>  शनी महाराजांना ज्येष्ठ व्यक्ती आणि गरीब लोकांप्रती जास्त कणव असते. अशा लोकांना दुखावलेले, फसवलेले त्यांना अजिबात चालत नाही. एखाद्याची फसवणूक केली पण त्याला ती कळली नाही, तर यात आनंद मानू नका. कारण दुसऱ्याची फसवणूक केल्याची शिक्षा शनी महाराज नक्कीच देतात आणि ती शिक्षा भोगताना मात्र मनुष्य रडकुंडीला येतो. 

>> साडेसातीच्या काळात लोखंड, तेल आणि केरसुणीची खरेदी करू नये. या वस्तूंची खरेदी शनी महाराजांना अपमानास्पद वाटू शकते. या वस्तूंची खरेदी करण्याऐवजी शनिवारी या वस्तूंचे दान केले पाहिजे. तसेच काळे तीळ आणि उडीद डाळ दान केल्यास खूप लाभ होतो. 

>> पिंपळाच्या झाडावर शनी देवांचा वास असतो असे मानतात. परंतु घराच्या भिंतीवर उगवलेले पिंपळाचे रोपटे अशुभ मानले जाते, म्हणून ते वेळीच काढून टाकले जाते. परंतु साडेसातीच्या काळात पिंपळाचे मूळ उपटून शनी महाराजांचा रोष ओढवून घेऊ नये. उलट दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून यावे. 

>> ज्येष्ठ आणि गरीब व्यक्तींची सेवा सुश्रुषा केली असता शनी महाराज प्रसन्न होतात. म्हणून केवळ साडे सातीच्या काळातच नाही, तर अन्य वेळीसुद्धा ज्येष्ठांचा आदर करावा आणि गरीब, गरजू लोकांना यथाशक्ती दान करावे. त्यामुळे शनी महाराज प्रसन्न राहतात. 

Web Title: Are you going through sadesati? So avoid these mistakes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.