तुमचीही साडेसाती सुरु आहे का? मग हे उपाय अवश्य करा. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 08:00 AM2021-05-29T08:00:00+5:302021-05-29T08:00:00+5:30

ज्योतिषाचार्य म्हणतात की जे चांगले कर्म करतात तेच शनिदेवाला प्रसन्न करतात. त्याच वेळी, जे वाईट कृत्य करतात त्यांना शनी देवाची भीती वाटते. त्यांचे म्हणणे आहे की शनिदेवांना घाबरण्याऐवजी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्या कृतीत सुधारणा देखील केली पाहिजे.

Are you going through Sadesati? Then you must do this remedy. | तुमचीही साडेसाती सुरु आहे का? मग हे उपाय अवश्य करा. 

तुमचीही साडेसाती सुरु आहे का? मग हे उपाय अवश्य करा. 

Next

साडेसाती या शब्दालाही आपण घाबरतो. साडेसातीच्या काळात सगळे वाईटच घडते, असा आपण समज करून घेतलेला आहे. परंतु साडेसाती हा आपला परीक्षा काळ असतो. त्यात उत्तीर्ण झालो तर आयुष्यभराची शिकवण मिळते. त्यामुळे या अवघड काळाला सामोरे जाण्यासाठी पुढील उपाय अवश्य करून पहा. 

साडेसातीच्या काळात शनि देवांची कृपा व शांतीसाठी तीळ, उडीद, मिरपूड, शेंगदाण्याचे तेल, लोणचे, लवंगा, तमालपत्र आणि काळे मीठ या पदार्थांचे गरजूंना दान करावे. शनी देवांची आणि हनुमंताची पूजा करावी. शनिदेवांच्या नावे दान म्हणून काळे कपडे, बेरी, काळी उडीद, काळ्या चपला, काळे तीळ, लोखंड, तेल इत्यादी वस्तूंचेही दान करता येते. 

हे दान तसेच शनी देवाची पूजा केल्यास साडेसातीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शनिदेवांना दानशूर व्यक्ती आवडतात. आपल्या कृतीमुळे प्रसन्न होऊन ते साडेसातीच्या काळात आपल्याला मार्ग दाखवतात. तसेच, कुंडलीतील दुष्परिणामांशी संबंधित अडचणींपासून आपले रक्षण करतात अथवा परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ देतात. 

शनिदेव हे पृथ्वीचे दंडाधिकारी आहेत

ज्योतिषाचार्य म्हणतात की शनिदेव सूर्यपुत्र आहेत. शनिदेव यांना कर्माची आणि न्यायाची देवता देखील म्हटले जाते. शनिदेवाने भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येने खूष होऊन भगवान शिवाने त्यांना नवग्रहांमधे श्रेष्ठ असल्याचे वरदान दिले. म्हणाले की आपण पृथ्वीलोकचे न्यायाधीश आणि दंडाधिकारी व्हाल. तू लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे न्याय व शिक्षा देशील.

ज्योतिषाचार्य म्हणतात की जे चांगले कर्म करतात तेच शनिदेवाला प्रसन्न करतात. त्याच वेळी, जे वाईट कृत्य करतात त्यांना शनी देवाची भीती वाटते. त्यांचे म्हणणे आहे की शनिदेवांना घाबरण्याऐवजी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्या कृतीत सुधारणा देखील केली पाहिजे.

Web Title: Are you going through Sadesati? Then you must do this remedy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.