घरातील लक्ष्मी कोणत्या गोष्टींमुळे होते नाराज?, चुकूनही करू नका 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 07:59 PM2022-03-21T19:59:00+5:302022-03-21T19:59:35+5:30

धनाची देवी लक्ष्मीची कृपा राहिली तर जीवनाशी संबंधित सर्व सुख सहज मिळू शकतं. कष्टाचं फळ आणि धनलाभ मिळावा म्हणून बहुतेक लोक लक्ष्मीची पूजा-अर्चा करतात.

Astro ideas these mistakes can make angry Maa Lakshmi in marathi | घरातील लक्ष्मी कोणत्या गोष्टींमुळे होते नाराज?, चुकूनही करू नका 'या' गोष्टी!

घरातील लक्ष्मी कोणत्या गोष्टींमुळे होते नाराज?, चुकूनही करू नका 'या' गोष्टी!

googlenewsNext

धनाची देवी लक्ष्मीची कृपा राहिली तर जीवनाशी संबंधित सर्व सुख सहज मिळू शकतं. कष्टाचं फळ आणि धनलाभ मिळावा म्हणून बहुतेक लोक लक्ष्मीची पूजा-अर्चा करतात. असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीची कृपा जर एखाद्यावर राहिली तर अडचणी आणि दुःखं संबंधित व्यक्तीला त्रास देत नाहीत. असंही म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा असेल तर त्याच्या जीवनात धन, समृद्धी, मान-सन्मान, कीर्ती इत्यादीची कमतरता कधीच भासत नाही. मात्र, आपल्या चुकांमुळे किंवा इतर कारणांमुळे माता लक्ष्मी जर कोणावर रागावली तर राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. अनेकदा लोक अशा काही चुका करतात की ज्या माता लक्ष्मीच्या नाराजीचं कारण बनतात.

एखाद्या गोष्टीमधून आपण माता लक्ष्मीला दुखावतोय हे लोकांना कळतही नाही. कोणत्याही घरातून धनदेवतेचे प्रस्थान होण्याचे केवळ घराशी संबंधित वास्तू दोषच मोठे कारण बनत नाहीत तर दैनंदिन जीवनाशी संबंधित आपल्या काही सवयी देखील यासाठी कारणीभूत असतात. 

झाडूचा अपमान
घरात वापरण्यात येणारा झाडू धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. अनेकदा लोक झाडू घरात वापरल्यानंतर अशा ठिकाणी ठेवतात, जिथे पाय लागण्याची शक्यता असते. असं मानलं जातं की जर एखाद्यानं झाडूला पाय लावला तर त्याचा अपमान होतो आणि तो देवी लक्ष्मीचा अपमान केल्यासारखं आहे. एवढंच नाही तर ज्योतिष शास्त्रात असं सांगितलेलं आहे की, झाडू अशा ठिकाणी ठेवू नये, जिथं तो लोकांच्या डोळ्यांना दिसेल. कारण सहज दिसेल अशा ठिकाणी झाडू घरात असेल तर घरात पैशाची कमतरता भासण्याचं ते कारण ठरू शकतं. झाडू लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.

अन्नाची नासाडी
ज्या लोकांना अनेकदा अन्न वाया घालवण्याची सवय असते, त्यांना लक्ष्मीच्या कोपाचा सामना करावा लागू शकतो. अन्न वाया गेल्यानं देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि अशा लोकांच्या जीवनात आर्थिक समस्या वारंवार येतात. एवढंच नाही तर पाण्याचा अपव्यय हे लक्ष्मीच्या नाराजीचं कारण बनू शकतं. असं झाल्यावर माता लक्ष्मी रागावते आणि घरातून निघून जाते, असं मानलं जातं. 

पांढर्‍या रंगाची फुलं अर्पण करणं चुकीचं
अनेकदा लोक नकळत देवी लक्ष्मीला पांढरे फूल अर्पण करण्याची चूक करतात. लक्ष्मी देवीला पांढरे फूल अर्पण करण्यास शास्त्रात निषिद्ध आहे. पांढरे फूल अर्पण केल्याने माता लक्ष्मी नाराज होतात. लक्ष्मीची पूजा करताना फुलं अर्पण करायची असतील तर जास्वंद, गुलाब किंवा झेंडूची फुलं अर्पण करावीत.

Web Title: Astro ideas these mistakes can make angry Maa Lakshmi in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.