Astro Tips: मार्च महिन्याचे पहिले चार दिवस अधिक सतर्कतेचे; बाराही राशींनी पाळा 'हे' नियम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:00 IST2025-02-28T15:55:56+5:302025-02-28T16:00:56+5:30
Astro Tips: शनिवारी १ मार्च पासून शुक्राचा स्तंभ सुरु होत आहे, त्याचा बारा राशींवर परिणाम होणार आहे, म्हणून लेखात दिल्याप्रमाणे विशेष काळजी घ्या!

Astro Tips: मार्च महिन्याचे पहिले चार दिवस अधिक सतर्कतेचे; बाराही राशींनी पाळा 'हे' नियम!
>> सुमेध रानडे, ज्योतिष अभ्यासक, पुणे
शनिवार १ मार्च पासून मंगळवार ४ मार्च पर्यंत शुक्राचा स्तंभ आहे अर्थात त्याची गती कमी होणार आहे. त्यामुळे आज पासून येत्या तीन चार दिवसात सर्वसाधारणपणे सगळ्यांनीच पुढे दिल्याप्रमाणे काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. अन्यथा अघटित घडू शकते.
- वैवाहिक आणि इतर नातेसंबंधांबद्दल काळजी घ्यावी, कोणतेही टोकाचे निर्णय घेऊ नये
- पिण्याचे पाणी, ज्यूस, बर्फ, द्रव्य पदार्थ इत्यादी बाबतीत जास्त दक्षता घ्यावी विशेष करुन ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी हे पाळावेच
- वाहन सावकाश चालवावे
- आर्थिक गुंतवणूक खात्रीच्या ठिकाणीच करावी, नवीन प्रयोग नको
- सौंदर्य प्रसाधने जपून वापरावी, नवीन प्रयोग नको
- कापड, सौंदर्य वस्तू, फुले, वाहन, क्रीडा, रसायने, सुखसोयी वस्तू खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी.
- तसेच मनोरंजन क्षेत्रातील लोक, कलाकार आणि कलाक्षेत्राशी निगडीत लोक, स्त्रीरोगतज्ञ, डोळ्यांचे डॉक्टर, शास्त्रज्ञ, ब्युटी पार्लर व्यावसायिक यांनी देखील विशेष काळजी घ्यावी.
- अविवाहित, घटस्फोटीत, लहान वयात वैधव्य आलेल्या किंवा कोणतीही वैवाहिक समस्या असलेल्या सगळ्यांनी या काळात चारित्र्याशी निगडित अधिक काळजी घ्यावी.
- या काळात व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक आणि देवीसूक्त आवर्जून म्हणावे!
त्याचबरोबर राशीनुसार पुढील संदर्भात काळजी घ्यावी:
मेष - वैवाहिक जोडीदार, व्यावसायिक भागीदार, कोर्ट कचेरी, पैसा दागिने, डोळे, दात या संदर्भात
वृषभ - साधारण आरोग्य, पैसे, मित्रमैत्रिणी, ओळखीचे लोक, मामामावशी या संदर्भात
मिथुन - नोकरीतील काम आणि वरिष्ठ लोक, संतती, शिक्षण, प्रेम प्रकरणे, दूरचे प्रवास या संदर्भात
कर्क - नावलौकिक, समाजकार्य, आई, घर, जमीन, शेती, दूरचे प्रवास या संदर्भात
सिंह - एकूण आरोग्य, भाऊबहिणी, अवैध मार्गाने मिळवलेला पैसा, नोकरीतील जबाबदाऱ्या, मूत्रविकार या संदर्भात
कन्या - वैवाहिक जोडीदार, व्यवसायातील भागीदारी, डोळे, दात, खाणेपिणे, आर्थिक देवाण घेवाण या संदर्भात
तूळ - एकूण आरोग्य, कफ विकार, त्वचा, केस, पोट, सासुरवाडीचे कुटुंब या संदर्भात
वृश्चिक - वैवाहिक आयुष्य, पाठ, कंबर, संतती, खेळ क्रीडा, प्रेम प्रकरणे, कोर्ट कचेरी या संदर्भात
धनू - आई, मामामावशी, घर, वाहन, जमीन, निद्रा, राग लोभ मत्सर, तुमचे स्पर्धक या संदर्भात
मकर - भावंडं, संतती, नोकरीतील काम, वरिष्ठांशी मतभेद, कान घसा हात मान, पाण्याजवळची सहल या संदर्भात
कुंभ - डोळे, दात, घसा, खाणंपिणं, घरातील पैसे आणि दागिने, नावलौकिक, मानसन्मान या संदर्भात
मीन - चेहरा, डोकं, केस, डोळे, कफविकार, एकूण आरोग्य, भाऊबहिण, लहान प्रवास या संदर्भात
यात घाबरण्याची गरज नाही, सावध राहणे केव्हाही चांगले, त्यासाठी हा लेखनप्रपंच! बाकी पाठीशी स्वामी आहेच!
श्रीस्वामी समर्थ