Astro Tips: रागावर नियंत्रण राहत नाही? सप्तशतीचे पाठ करा, लाभ मिळवा; वाचा नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:42 AM2024-06-20T11:42:36+5:302024-06-20T11:43:15+5:30

Astro Tips: सद्यस्थितीत प्रत्येक नात्यात रुसवे फुगवे एवढे वाढले आहेत की त्याचे पर्यवसान नातं तुटण्यात होते; रागाचे हे टोक गाठण्याआधी वाचा दिलेला उपाय!

Astro Tips: Can't control anger? Recite Saptashati, gain benefits; Read the rules! | Astro Tips: रागावर नियंत्रण राहत नाही? सप्तशतीचे पाठ करा, लाभ मिळवा; वाचा नियम!

Astro Tips: रागावर नियंत्रण राहत नाही? सप्तशतीचे पाठ करा, लाभ मिळवा; वाचा नियम!

>>दिप्ती जोशी, 
(मास्टर टॅरो अंकशास्त्र रेकी क्रिस्टल कुंडली मार्गदर्शक)

सप्तशतीतले अनेक मंत्र प्रासादिक आहेत. ती मंत्रसिद्धी मिळावी यासाठी नियमही पाळायला हवेत. जर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी, इतरांशी वादविवाद थांबवण्यासाठी, नात्यात माधुर्य आणण्यासाठी हे मंत्रोच्चार करणार असाल तर जाणून घ्या नियम. 

  • सप्तशती पाठ सुरू करण्याआधी गुरुदेव, कुलदेवी, कुलदैवत नी गणपती बाप्पा ह्यांचे मंत्र जप म्हणून त्यांचे आशीर्वाद घेऊन, त्यांना सांगा, 'मी सप्तशती पाठ करत आहे, ते पूर्णत्वास न्यावे.'  
  • माता भगवतीची आराधना करावी नी महादेव मंत्राची एक माळ जप करावा.
  • सुरुवातीला पोथी मध्ये सगळ लिहिलेलं आहे त्यामुळे न्यास , कवच स्तोत्रं विधिवत म्हणावीत. 
  • नवार्ण मंत्र जपाची तीन माळ पाठ सुरू करण्याआधी नी पाठ संपल्यावर म्हणावे.
  • तेच महादेव ह्यांच्या मंत्राच आहे. 
  • सगळं म्हणून झाल्यावर क्षमा याचना श्लोक म्हणावा. 
  • ते  पूर्ण झाल्यावर, उठण्याआधी आसनावरून चारही दिशांना पाणी शिंपडावे, नी आसनाच्या खाली एक पळी पाणी सोडावे. त्यांनतर डोळ्यांना पाणी लावावे. माथ्यावर कपाळावर पाणी लावावे नी इंद्र देवतांची प्रार्थना करावी. 'हे इंद्र देवता मी जे काही मंत्र जप, पूजा पाठ केला आहे त्यातून जी ऊर्जा मला मिळाली आहे नी पुण्य साठले आहे ते माझे मला मिळू दे.'
  • तीन वेळा माथ्यावर हात ठेवून 'शक शकाय नमः' म्हणावे. 
  • आपले आसन, जप माळ ही नेहमी वेगळी असावी. एकमेकांचे वापरू नये. 
  • पाठ म्हणताना किंवा जप करताना पुरुषांनी रुमाल /टोपी घालावी. 
  • स्त्रियांनी साडीचा पदर किंवा ओढणी डोक्यावरून घ्यावी. 
  • आरती करावी, प्रसाद देवीचा सगळ्यांना द्यावा. 
  • मांसाहार मद्यपान कांदा लसूण खाऊ नये. शक्य असल्यास फल आहारावर रहावे. अथवा एक वेळ जेवावे.
  • जमल्यास रोज एका चांदीच्या तांब्यात किंवा काचेच्या गलासात पाणी भरून ठेवावे. सगळं पूर्ण झाल्यावर ते पाणी प्यावे. वॉटर चार्जचा अनुभव ह्या सकारात्मक शक्तींनी येईल.
  • आताशी सुरुवात केली असेल म्हणजे पहिल्यांदाच तर घाबरून जाऊ नका. सप्त शती, नवनाथ पारायण, किंवा कोणत्याही मंत्र जप अनुष्ठान करून सुरुवात केल्यावर प्रत्येक जातकाला हा अनुभव येतोच, पण कोणत्याही स्थितीत संकल्प तुटू देऊ नका. निगेटिव्ह शक्ती बाधा आणतात. पूर्ण पाठ करा. कितीही कलह झाला तरी खंड पडून देऊ नका.
  • जस जसे तुमचे पारायण महिन्यातून एकदा दोनदा व्हायला लागेल, नेहमी होत राहील, तस तसा तुम्हाला फरक जाणवेल. ९-११ पारायण झालं की ही नकारात्मकता कमी होऊन वास्तूत चैतन्य निर्माण होईल.
  • फक्तं पारायण पूर्ण झालं की कुमारी भोजन, त्यांना यथा शक्ती वाण,ब्राह्मण भोजन ई होऊ दे, म्हणजे संकल्प लवकर पूर्ण होतो. कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते. यथासांग सगळ केलं की.नी मनातील ईच्छा फलित होतात.
  • सगळ्यात महत्वाचं, कोणतीही साधना जप तप ह्यावेळी आपल्या धर्म शास्त्रात मौनाला खूप महत्व दिले आहे त्यामुळे जितकं मौन व्रत पाळता येईल तेवढे पाळावे. भगवती किंवा कुलदेवी मंत्र जप त्या काळात सतत सुरू ठेवावा. मौन व्रत ह्यासाठी सांगितले आहे जेणेकरून निर्माण झालेली ऊर्जा बोलण्याने क्षय होऊ नये. 

Web Title: Astro Tips: Can't control anger? Recite Saptashati, gain benefits; Read the rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.