Astro Tips: सकाळी सकाळी 'या' गोष्टी नजरेस पडल्या तर मिळते अचानक धनलाभाची संधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 07:00 AM2024-02-17T07:00:00+5:302024-02-17T07:00:02+5:30
Astro Tips: काही गोष्टींचे दर्शनही दुर्मिळ असते आणि त्या सकाळीच दिसल्या की लाभ होतो हे नक्की, त्याबद्दल सविस्तर वाचा!
आपली सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो. म्हणून धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे उघडताच आपल्या तळ हाताचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे. कारण आपल्या हातात लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद यांचा वास असतो. त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करावी हा त्यामागचा हेतू असतो. त्यानंतरही काही गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्यांचे दर्शन आपल्या दिवसाला आनंद दायी, लाभदायी होण्यास कारणीभूत ठरते.
सकाळी पुढील गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या तर त्या लाभदायी ठरणार असे समजा:
>> सकाळी जाग येताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर समजून जा की दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मात्र लक्षात घ्या, पक्ष्याचा किलबिलाट पहाटेच जास्त ऐकू येतो. त्यामुळे आपल्यालाही पहाटे जाग येणे क्रमप्राप्त झाले. ज्याचा दिवस ब्रह्म मुहूर्तावर सुरु होतो त्याचा दिवस चांगला जाणारच असे शास्त्र सांगते!
>> सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष देव दर्शनाला सोवळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसला, तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला मोठे काम मिळण्याचीही शक्यता असते.
>> सकाळी उठल्यावर आपल्याला पांढऱ्या फुलांचे दर्शन घडत असेल तर दिवस आनंददायी जाणारच!
>> ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधाचे भरलेले पातेले दिसणे हेदेखील शुभ व सुबत्तेचे लक्षण मानले गेले आहे. तसेच तुमच्या घरात दूध, दह्याची साठवण केल्यामुळे लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहील.
>> सकाळी किंवा कामासाठी घराबाहेर पडताना गो मातेचे दर्शन होणे देखील शुभ ठरते. गोमातेच्या केवळ दर्शनानेदेखील आपल्या नोकरी, व्यायवसायत भरभराट होते.
>> सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दर्शन घडणे देखील शुभ मानले जाते. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार, याचे ते चिन्ह असते.
>> एखाद्या झाडाला फळे लगडलेली पाहिलीत, तर तुमच्या प्रयत्नांनादेखील लवकरच चांगले फळ मिळणार आहे असे समजून जा.
>> सकाळी डोळे उघडताच जवळच्या मंदिरातील किंवा घरातल्या देव्हाऱ्यातील घंटेचा नाद कानावर पडत असेल तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता जाते. तसेच कोणतेही बिघडलेले किंवा रखडलेले काम पूर्ण होऊ शकते.