Astro Tips: कुंडलीदोष निवारणासाठी मंगळवारी 'अशी' करा हनुमंताची उपासना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 07:05 IST2025-03-04T07:00:00+5:302025-03-04T07:05:01+5:30
Astro Tips: कुंडली दोष नष्ट होऊन बाप्पासकट मारुति रायचेही आशीर्वाद मिळावेत म्हणून दिलेले उपाय करा!

Astro Tips: कुंडलीदोष निवारणासाठी मंगळवारी 'अशी' करा हनुमंताची उपासना!
मंगळवार हा जसा गणपती बाप्पाला समर्पित केला आहे तसाच तो संकटमोचन हनुमंतालाही समर्पित आहे. तसेच शनिवार हा हनुमंताचा जन्मवार असल्याने शनिवारीदेखील त्याची पूजा केली जाते. काही हनुमंत भक्त मंगळवार आणि शनिवार उपासही करतात. मात्र ज्यांना उपास शक्य नाही त्यांनी निदान उपासनेवर भर द्यावा!
>>कुंडलीत मंगळ दोष असला तर दर मंगळवारी जातकाने हनुमानाची पूजा करावी. त्यामुळे मंगळ प्रतिकूल ठरत नाही उलट मंगलकारी ठरतो. विशेषतः कुंडली दोष असतील तर पुढील उपाय जरूर करावेत!
>>मंगळवारी हनुमान स्तोत्राचे पठण सुरू करा. हे स्तोत्र २१ वेळा म्हटल्यास अधिक लाभ होतो. परंतु तेवढा वेळ देणे शक्य नसेल तर एका जागेवर बसून हनुमंताची पूजा करावी आणि एकदा हे स्तोत्र मनापासून म्हणावे. हनुमंताच्या स्तोत्र पठणाने शत्रूपासून मुक्ती मिळते.
>>सलग २१ मंगळवार हनुमानाच्या देवळात गूळ हरभरा अर्पण केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.
>>जर एखाद्या व्यक्तीला शारीरिक त्रास होत असेल तर त्याने मंगळवारी एक भांडे पाण्याने भरून हनुमंताच्या प्रतिमेसमोर ठेवावे. तसेच २१ दिवस हनुमान चालीसाचे पठण करावे. पठण पूर्ण झाले की पाणी बदलून टाकावे.
>> जर तुम्हाला एखाद्या समस्येने किंवा नैराश्याने ग्रासले असेल तर कोणत्याही मंगळवारपासून 'ओम हनुमंते नमः' मंत्राचा १०८ वेळा जप करावा.