Astro Tips: लक्ष्मीकृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ 'या' पाचपैकी एक वस्तू ठेवाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:16 IST2025-04-18T16:13:39+5:302025-04-18T16:16:15+5:30
Astro Tips: शुक्रवार हा देवीचा वार, लक्ष्मीची उपासना आपण करतोच, पण ती आपणहून आपल्याघरी यावी यासाठी पुढे दिलेल्या चारापैकी एक तोडगा अवश्य करा!

Astro Tips: लक्ष्मीकृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ 'या' पाचपैकी एक वस्तू ठेवाच!
भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी सगळेच संसारी लोक लक्ष्मी मातेची उपासना करतात. त्यालाच जोड म्हणून ज्योतिष शास्त्रात असे काही तोडगे सांगितले आहेत ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर कृपावंत होईल आणि तुमच्या वास्तू मध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करेल. यासाठी आपल्याला शरण जायचे आहे तुळशी मातेला!
तुळशी ही श्रीहरी विष्णूला प्रिय असते. म्हणून हिंदू घरात इतर कोणती रोपे असो वा नसो, तुळशीचे रोप असतेच. तुळशीजवळ दिवा पाहून श्रीहरी विष्णू येतात आणि ते जिथे येतात तिथे माता लक्ष्मी येते हा विश्वास आहे. म्हणूनच दोहोंची कृपा व्हावी म्हणून ज्योतिष शास्त्रात दिलेले उपाय करा.
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
गोमती चक्र :
गोमती चक्र हे देवी लक्ष्मीला प्रिय मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात गोमती चक्र असते, तिथे माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. शुक्रवारी ११ गोमती चक्र घ्या आणि त्यांना लाल कापडात बांधा. ती तुळशीच्या रोपाजवळ ठेवा. हे साहित्य आठवडाभर एकाच ठिकाणी ठेवा. त्यानंतर, पुढच्या शुक्रवारी, ते वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय चार शुक्रवार करा.
चांदीचे नाणे:
शास्त्रांमध्ये चांदीचे नाणे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सायंकाळी तुळशीच्या झाडाजवळ चांदीचे नाणे ठेवा आणि तिथे काही वेळ बसून तुलसी चालीसा पठण करा. असे केल्याने तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास्तव्य करते. वास्तु सुख समृद्धीने परिपूर्ण होते.
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
शाळीग्राम :
तुळशीजवळ शालिग्राम ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. शुक्रवारी हा उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. शुक्रवारी तुळशीच्या रोपाजवळ शाळीग्राम ठेवा. कारण शाळीग्राम हे विष्णूंचे प्रतीक आहे. हा उपाय केल्यानंतर, लक्ष्मी चालीसा पठण केल्याने तुम्हाला पूर्ण फायदा मिळू शकतो.
तुपाचा दिवा :
शुक्रवारी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते, विशेषतः देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा उपाय करावा. हा उपाय केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही तर तो संपत्ती, आनंद, शुभेच्छा आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. दर शुक्रवारी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा आणि लाभ मिळवा.
Astro Tips: लक्ष्मीकृपा सदैव राहावी म्हणून सकाळी जाग आल्यावर पहिले करा 'ही' कृती!
कच्चे दूध :
शुक्रवारी तुळशीमातेला कच्चे दूध अर्पण करणे हा खूप शुभ आणि फलदायी उपाय मानला जातो. धन, सुख, शांती, वैवाहिक सुख आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. आहे. कच्चे दूध हे पवित्रता, कोमलता आणि भक्तीचे प्रतीक आहे. तुळशीवर कच्चे दूध अर्पण केल्यावर ते देवी लक्ष्मीला प्रसन्न करते आणि आकर्षून घेते.