Astro Tips: घराबाहेर पडताना तसेच वाहन सुरू करताना म्हणा हनुमंताचा दोन ओळींचा श्लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 10:40 AM2024-10-05T10:40:27+5:302024-10-05T10:41:39+5:30

Astro Tips: 'तुम रक्षक काहु को डरना' असं तुलसीदासांनी हनुमान चालीसामध्ये हनुमंताला उद्देशून म्हटले आहे; त्याच दृष्टीने 'हा' श्लोकही महत्त्वाचा!

Astro Tips: Say two lines of Hanumanta Shlok while leaving home and driving! | Astro Tips: घराबाहेर पडताना तसेच वाहन सुरू करताना म्हणा हनुमंताचा दोन ओळींचा श्लोक!

Astro Tips: घराबाहेर पडताना तसेच वाहन सुरू करताना म्हणा हनुमंताचा दोन ओळींचा श्लोक!

उठताना, झोपताना, जेवताना, कामाला सुरुवात करताना तसेच घराबाहेर पडताना भगवंताच्या नावाचे स्मरण करून निघावे असा आपल्या पूर्वजांनी आपल्यावर घातलेला संस्कार आहे. आपण तसे करतोही! आपल्या आराध्य देवतेचे नाव घेतो. त्याबरोबरच ज्योतिष शास्त्राने हनुमंताचे स्मरण करून घराबाहेर पडा असे म्हटले आहे. हनुमंताचे नाम घेतल्याने आपल्या जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर येते, असे म्हटले जाते. 

पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त! ते चिरंजीवी आहेत. एवढेच नाही तर ज्या रामभक्तांवर काही संकट येईल त्या संकटाच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचनच दिले आहे. यासाठी संत तुलसी दास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले आहे. जेणेकरून आपल्याला संकटाचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागला तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटाचे निवारण होईल हा त्या स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे. दोन ओळीचा श्लोक आपण जाणून घेणारच आहोत, तत्पूर्वी हनुमान चालीसा हे स्तोत्र रोज संपूर्ण म्हटले तर कोणते लाभ होतात तेही जाणून घेऊ. 

हनुमान चालीसा स्तोत्र पठणाचे नियम आणि लाभ :

हनुमान चालीसा ही केवळ मारुती रायाची उपासना नाही, तर हे इच्छापूर्ती स्तोत्र आहे. जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचे पालन करा. 

१) सदर उपक्रम मंगळवारपासून सुरू करा.

२) आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी. दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही. स्वउत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रगट करावी. 

३) हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो.  म्हणून पहाटे ४ ते ६ दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी. 

४) हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं वाहावीत आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 

५) शांत चित्ताने हनुमान चालीसा स्तोत्रपठण सुरु करावे. 

६) इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग ११ दिवस ११ वेळा म्हणावे. 

७) स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे. 

८) अकराव्या दिवशी ११ वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यावर 'बजरंग बाण' हे स्तोत्र म्हणावे. कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे. 

लक्षात ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा. ते सुख चिरंतन टिकणारे आहे. तसेच दुसऱ्यांचे अहित चिंतू नका. हनुमंत तुमच्यावर रोष धरतील असे वागू नका. कालच्यापेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या आपले व्यक्तिमत्त्व कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा आणि हा उपाय तुमच्याही मित्रपरिवारात गरजूंना जरूर सुचवा. सदर उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो, असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे!

सरतेशेवटी दोन ओळींचा श्लोक जाणून घेऊया -

चलत विमान कोलाहल होईल,
जय रघुवीर कहत सब कोई ।।

(ज्योतिष तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सदर माहिती उपासनेहेतु सांगितली आहे, याची नोंद घ्यावी)

Web Title: Astro Tips: Say two lines of Hanumanta Shlok while leaving home and driving!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.