Astro Tips: शेगडीच्या पूजेने करा दिवसाची सुरुवात; आजारपण येणार नाही घरात!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 03:19 PM2024-09-23T15:19:01+5:302024-09-23T15:19:19+5:30
Astro Tips: पूर्वीच्या बायका स्वयंपाकघर सारवून, रांगोळी काढून चूल पेटवायच्या; आपण निदान पुढील टिप्स फॉलो केल्या तरी होतील अनेक लाभ!
घरात एक व्यक्ती जरी आजारी असली तरी पूर्ण घराला आजारपण येतं. अशा स्थितीत घरातलं चैतन्य हरवल्यासारखं वाटतं. औषधोपचारात पैसा खर्च होतो तो वेगळाच! यासाठीच ज्योतिष शास्त्राने एक प्रभावी उपाय सुचवला आहे. त्याचा उपयोग रोज करा. दिलेला उपाय सलग महिनाभर केल्याने घरातील आजारपण दूर होण्यास मदत होते.
>> यासाठी रोज सकाळी आपल्या किचनमधल्या शेगडीखाली दोन बोटं रांगोळी काढावी.
>> फुल असेल तर, अन्यथा हळद कुंकू वाहून मगच शेगडीचा वापर सुरु करावा.
>> तसेच गॅस शेगडी सुरू करण्याआधी तिला मनोभावे नमस्कार करावा.
>> मगच शेगडीचा वापर सुरु करावा.
हा उपाय कशासाठी?
तर शेगडीचा संबंध थेट अग्नीशी आहे. अग्नी शांत असेल तर त्यावर केलेला स्वयंपाक हा आरोग्यासाठी पोषक ठरतो, बाधत नाही आणि ते अन्न खाल्ल्यामुळे आरोग्यही चांगले राहते. म्हणून रोज शेगडीची पूजा करून वापर सुरु करावा. तसेच स्वयंपाकात पोळी, भाजी किंवा तत्सम पदार्थ केल्यावर त्याचा एक घास नैवेद्य म्हणून शेगडीवर ठेवावा. त्यामुळे अग्नी तृप्त होतो आणि पर्यायाने आरोग्यही चांगले राहते व आर्थिक नुकसान टळते.
आपल्या आई-आजीने हे उपाय करताना, शेगडीची पूजा करताना, चूल सारवून रांगोळी काढताना आपण पाहिले, ऐकले असेल. या छोट्याशा उपचारामुळे त्याकाळात घरात आजाराचे प्रमाण कमी होते. कालौघात आधुनिक किचन करण्याच्या नादात आपण त्या प्रथा परंपरांना तिलांजली दिली आणि रोगराई ओढवून घेतली. म्हणून पुन्हा नव्याने त्या उपायांचा वापर करूया आणि आरोग्य संभाळुया!