Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:58 IST2025-04-19T15:55:33+5:302025-04-19T15:58:03+5:30
Astro Tips: २१ एप्रिलचा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने या वर्षातला सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार आहे; इच्छापूर्तीसाठी त्या रात्री दिलेला उपाय अवश्य करा.

Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
प्रत्येक दिवस नवनवीन संधी घेऊन येतो असे म्हणतात. कारण आपल्या मनावर, विचारांवर, सभोवतालच्या परिस्थितीवर तसेच भौगोलिक घटनांवर प्रभाव टाकणारे ग्रह स्थित्यंतर करत असतात. असाच एक मोठा बदल होणार आहे २१ एप्रिल २०२५ रोजी! तो काय असणार आहे आणि त्याचा लाभ काय ते जाणून घेणार आहोत, ज्योतिष अभ्यासक अरुण कुमार व्यास यांच्याकडून!
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी आवाक्याबाहेर? 'या' पाच वस्तू भरून काढतील सगळी कसर!
व्यास यांच्यानुसार सोमवारी म्हणजेच २१ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या प्रमाणात उल्कापात होणार आहे. एक तारा तुटला तरी आपण मनातली इच्छा प्रगट करतो आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करतो. पण सोमवारी अशा अनेक उल्का पडणार असल्याने ब्रह्माण्डात मोठी ऊर्जा कार्यान्वित होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य उपाय केला पाहिजे.
तो उपाय म्हणजे - २१ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी गच्चीत, अंगणात वा मोकळ्या मैदानात जाऊन आकाशाकडे बघा. आपली अशी इच्छा जी अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून, वर्षांपासून पूर्ण व्हावी यासाठी आस लावून बसला असाल, ती इच्छा आकाशाकडे बघत मनातल्या मनात व्यक्त करा. ब्रह्माण्डातली संपूर्ण शक्ती तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करेल. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, ती म्हणजे व्यक्त केलेली इच्छा इतर कोणालाही सांगू नका. या क्षणाचा, संधीचा उचित लाभ घ्या आणि येत्या काळात इच्छापूर्तीच्या आनंदाचा लाभ घ्या!