Astrology : टकलू माणसं श्रीमंत असतात वा होतात असे म्हणतात; नेमकं सत्य काय? चला पाहू!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 07:00 AM2024-11-27T07:00:00+5:302024-11-27T07:00:02+5:30

Samudrika Shastra: टक्कल पडणे सौंदर्याला बाधा आणणारे असले तरी समुद शास्त्रात त्याचा अर्थ काय लावला आहे ते जाणून घेऊ!

Astrology : bald people are said to be or become rich; What is the real truth? Let's see! | Astrology : टकलू माणसं श्रीमंत असतात वा होतात असे म्हणतात; नेमकं सत्य काय? चला पाहू!

Astrology : टकलू माणसं श्रीमंत असतात वा होतात असे म्हणतात; नेमकं सत्य काय? चला पाहू!

टक्कल पडू लागले की लोक गमतीने म्हणतात, 'श्रीमंतीची लक्षणे आहेत!' वास्तविक ज्याला टक्कल पडते त्याला व्यथा विचारा. विरळ केसांमुळे सौंदर्य गमावल्यासारखं वाटतं, अकाली वय वाढल्यासारखं वाटतं आणि आत्मविश्वासही कमी झाल्यासारखा वाटतो. त्यावर लोकांची टीका सहन होत नाही. मात्र प्रश्न पडतो, सगळेच जण असे म्हणतात त्याअर्थी या विधानामागे काही तरी तथ्य असावे का? चला जाणून घेऊ टक्कल पडण्याचा आणि श्रीमंत होण्याचा दुरान्वये संबंध आहे की नाही ते!

मनुष्याच्या चेहरेपट्टीवरून शास्त्रज्ञांनी अनुभवाने बरेच आडाखे बांधले आहेत. कपाळ मोठे असणे, नाक तरतरीत असणे, गालाला खळी पडणे वगैरे शुभ लक्षण मानतात. त्याउलट उंच माणसे, तिरळी माणसे, जाड ओठ असलेली माणसे दुर्दैवी असतात असेही संकेत आहेत. पण असा अनुभव प्रत्येक वेळी येईल असे नाही. लेखक अ.ल.भागवत `परम सुखाचे रहस्य' या पुस्तकात लिहितात...

टक्कल असलेला माणूस सामान्यत: श्रीमंत असतो, असा एक प्रवाद आहे. एका हिप्पीने श्रीमंत टकल्या माणसाकडे पाहून `खल्वाटो निर्धनो क्वचित' अशी म्हण तयार केली. या समजुतीत काहीच अर्थ नाही. अनेक टकल्या व्यक्ती दरिद्री अवस्थेत आढळतात. याउलट खूप केस असलेल्या व्यक्ती बड्या श्रीमंत असतात असेही दिसते. 

समुद्रशास्त्रानुसार सरधोपटपणे अनुमान काढले जाते. परंतु ते प्रत्येकाला तंतोतंत लागू होईलच असे नाही. प्रत्येकाची ठेवण वेगळी, प्रत्येकाचे भाग्य वेगळे. म्हणून एकच विचार सगळीकडे समान लागू होत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तिपरत्वे समुद्रशास्त्राचे निदान बदलते. त्यामुळे आपण लोकसमजुतींवर अवलंबून न राहता मेहनत करून श्रीमंत होण्यावर भर दिला पाहिजे. 

थोडक्यात शरीरावरील चिन्हांचा व श्रीमंतीचा अर्थाअर्थी संबंध नाही किंवा लक्ष्मी मातेला टक्कल पडलेले बाळ आवडते असा कुठेही पुराणात उल्लेख नाही. एक अनुमान काढले, तर मात्र लक्षात येईल, की केसाळ माणसापेक्षा टक्कल असलेला माणूस जास्त व्यवहारदक्ष, समंजस व शांत स्वभावाचा असतो. 

बाकी श्रीमंतीचा व टकलाचा खरोखर काही संबंध असता तर तरुण माणसे म्हणाली असती, `देवा तुझी संपत्ती नको पण आम्हाला टक्कल पडू दे!'

Web Title: Astrology : bald people are said to be or become rich; What is the real truth? Let's see!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.