Astrology : ज्ञानेश्वर माउलींच्या ओजस्वी लेखनशैलीला जोड मिळाली, ती 'या' ग्रहदशेची!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:07 AM2023-10-30T11:07:36+5:302023-10-30T11:08:04+5:30
Saint Dnyaneshwar: आपल्याकडे साहित्यिकांची कमतरता नाही, मात्र लेखनशैली प्रभावी होण्यासाठी गुरुकृपा आणि अनुकूल ग्रहदशाही तेवढीच महत्त्वाची!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
लेखन हे एक प्रभावी माध्यम आहे. समाजाची विचारधारा संपूर्णपणे बदलण्याची ताकद ह्या लेखणीत आहे त्यामुळे सर्वप्रथम ह्या लेखणीला तसेच आपल्या सद्गुरुना वंदन करूनच लिहावे . मनात विषयाची समज पक्की हवी . मूळ मुद्दे हवे तर लिहून काढावे आणि त्यानुसार परिच्छेद करून लिहावे. विषय कुठेही भरकटत जाणार नाही ह्याचे भान असावे. आपले म्हणणे वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारे असेल तरच त्याची पोचपावती आपल्याला मिळेल.
ज्योतिषीय दृष्टीकोनातून लेखन कौशल्य अभ्यासताना मी माऊलींच्या पत्रिकेचा अभ्यास करीन . ज्ञानेश्वर माऊली ह्यांनी लिहिलेली ओं नमोजी आज्ञा , मोगरा फुलाला , अजी सोनियाचा दिनू हि काव्ये अजरामर झालेली आहेत . लेखनाचा मुख्य ग्रह बुध आणि ज्ञानाशिवाय लेखणी उजळणार नाही त्यामुळे ज्ञानाचा सागर गुरु. बुध ला योग्य रीतीने वळवायचे काम गुरूकडे आहे. लेखन हाताने लिहिले जातात म्हणून हात , बाहु महत्वाचे . बुध आणि गुरु सोबत नेप हा लेखनासाठी अंतस्फुर्ती देणारा ग्रह तसेच मनाचा कारक चंद्र सुद्धा तितकाच महत्वाचा . ज्ञानेश्वर माऊलींचे बुद्धीसामार्थ्य अचाट आणि विस्मय चकित करणारे होते . इतक्या लहान वयातील त्यांची समज वाखाणण्याजोगी होती. वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानाने भरलेला अमृतासारखा ग्रंथ त्यांनी रचला जो आज पुढील कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. कुंडलीच्या लाभ ते तृतीय भावापर्यंत त्यांच्या कुंडलीत गुरु चंद्र शुक्र राहू बुध ह्यासारख्या बलाढ्य ग्रहांचे अधिष्ठान आहे खांद्याचा वरचा भागात हे सर्व ग्रह आहेत . खांद्याचा वरील भाग म्हणजे जिथे मेदू आहे म्हणजेच बुद्धी मन विचारप्रणाली . बुद्धीचा कारक गुरु लाभेश लाभात , लग्नात उच्चीचा चंद्र जो तृतीयेश सुद्धा आहे ,चंद्र स्थिर राशीत , बुध गुरु नवपंचम , शुक्र बुधाच्या राशीत , चंद्र बुध लाभ , लग्नेश शुक्रवार व्ययेश मंगळाची दृष्टी , कीर्ती सातासमुद्रापलीकडे गेली , तृतीय स्थान आणि चंद्र शुक्र गुरु ह्यामुळे जनमानसात प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या लिखाणात तरलता आणि अपार सौंदर्य होते.
लेखन हि एक कला आहे आणि अनेकदा ती उपजत असायला लागते हा माझा अभ्यास सांगतो . ठरवून काहीही लिहिता येत नाही पण अभ्यास पूर्ण लेखन लेखनाचा दर्जा उंचावते . ओघवती आणि सहज सोपी भाषा वाचकांशी जवळचे नाते जोडते. सरतेशेवटी सर्वात मुख्य म्हणजे सद्गुरूंचा आशीर्वाद . स्वतःची साधना , उपासना , वाचन , संशोधन , विचार मंथन , अंतर्स्फुर्ती , योग्य वेळी योग्य विषयाची निवड करून केलेल्या लेखांची निर्मिती आत्यंतिक समाधान देते आणि वाचकांना अंतर्मुख होण्यास कारणीभूत ठरते.
लेखन कौशल्य हा गुरूंचा आशीर्वाद . लेखन करणे हे खचितच सोपे नाही त्यालाही कष्ट आहेत , आपला जीव ओतावा लागतो . लेखन हि गुरुकृपा आहे त्याचा योग्य मान ठेवावा , इतरांचे लेख चोरून साहित्य चोरी करून आपण सद्गुरूंच्या रोषास कारणीभूत होणार ह्याचे भान ठेवावे कारण आजकाल साहित्य चोरी हा प्रकार सर्रास आढळतो . तसेही लेख चोरून लेखकाची प्रतिभा तर नाही चोरता येणार हेही तितकेच खरे आहे. विचार व्हावा .
संपर्क : 8104639230