तुमच्या शरीरावरील जन्मखुण सांगते तुमचं भविष्य! जाणून घ्या कधी फळफळणार तुमचं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 05:12 PM2022-07-03T17:12:47+5:302022-07-03T17:15:37+5:30
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तसंच त्याचं भविष्य जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीरावरील जन्मखूण (Birthmark) महत्त्वपूर्ण मानली जाते. अनेक व्यक्तींच्या शरीरावर जन्मत: काही खुणा असतात.
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तसंच त्याचं भविष्य जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीरावरील जन्मखूण (Birthmark) महत्त्वपूर्ण मानली जाते. अनेक व्यक्तींच्या शरीरावर जन्मत: काही खुणा असतात. सामुद्रिक शास्त्रात (Samudrik Shastra) याच खुणांबद्दल विस्ताराने वर्णन केलं गेलं आहे. व्यक्तीच्या शरीरावरील प्रत्येक जन्मखुणेनुसार त्याचे वेगवेगळे अर्थ व महत्त्व असतं. सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावर असणाऱ्या खुणांचा काय अर्थ आहे, याबद्दल भोपाळ येथील रहिवासी ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सामुद्रिक शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर जन्मखूण असेल तर अशी व्यक्ती तल्लख बुद्धीची असते. अशा व्यक्ती व्यापार आणि नोकरीमध्ये उत्तम कामगिरी करतात. विशेष म्हणजे या व्यक्ती सर्वांना प्रिय असतात. एखाद्या व्यक्तीच्या कपाळाच्या मधोमध जन्मखूण असेल तर त्याचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं. ती व्यक्ती नेहमी आनंदी राहते व त्यामुळे इतरांसोबत या व्यक्तीचे नातेसंबंध अधिक दृढ असतात.
लक्ष्यप्राप्तीसाठी झपाटलेल्या गालावर खूण असलेल्या व्यक्ती
सामुद्रिक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या गालावर जन्मखूण असेल तर त्या व्यक्तीमध्ये नोकरी किंवा व्यवसायाबद्दल अधिक उत्सुकता असते. एखादं लक्ष्य ठरवलं असल्यास ते प्राप्त करण्यासाठी अशी व्यक्ती झपाटून त्याच्या पाठलाग करते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून लक्ष्य गाठणं हे उद्दिष्ट गालावर जन्मखूण असलेल्या व्यक्तीचं असतं. एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर जन्मखूण असेल तर त्या व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हिच बाब एखाद्या महिलेच्या बाबतीत असल्यास त्या महिलेचा विवाह समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीसोबत होऊ शकतो.
मानेवर जन्मखूण असणारी व्यक्ती असते आक्रमक
सामुद्रिक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मानेवर मागील बाजूस जन्मखूण असेल तर ती व्यक्ती अत्यंत आक्रमक स्वभावाची असते. अशा व्यक्तींना राग खूप लवकर येतो. रागावर नियंत्रण मिळवणं अशा व्यक्तींसाठी फार कठीण असतं. एखाद्या गोष्टीवर त्यांच्याकडून तत्काळ प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता असते.
तळहातावरील भाग्यरेषांवरून भविष्यात काय घडामोडी होणार याचा अंदाज ज्योतिषशास्त्रात बांधला जातो. तर शरीराची रचना आणि शरीरावरील खुणांच्या आधारे व्यक्तीचं भाग्य, स्वभावगुण व त्याच्या भविष्याबद्दल भाकीत सामुद्रिक शास्त्राद्वारे केलं जातं. व्यक्तींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांच्या अभ्यासाद्वारे वर्तवले जाणारे भाकीत प्रत्येक वेळी तंतोतंत खरे ठरेलच याची पूर्ण शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. पण आपल्या शरीरावरील जन्मखुणांच्या माध्यमातून भविष्य किंवा स्वभावगुणांबद्दल जाणून घेणं बऱ्याच जणांना आवडतं.