Astrology Tips: २०२५ मध्ये होणार ४ ग्रहांचे स्थलांतर; २०२४ संपण्यापूर्वी करा दिलेले उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:22 IST2024-12-16T17:22:20+5:302024-12-16T17:22:47+5:30
Astrology Tips :२०२५ मध्ये होणार ग्रहांचे मोठे बदल; नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी करा, ज्यामुळे नवीन वर्षात यश, कीर्ती, ऐश्वर्य मिळवण्यात बाधा येणार नाही!

Astrology Tips: २०२५ मध्ये होणार ४ ग्रहांचे स्थलांतर; २०२४ संपण्यापूर्वी करा दिलेले उपाय!
२०२५ हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. २०२५ हे वर्ष ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या वर्षी ४ मोठे ग्रह बदल करतील. 2025 च्या सुरुवातीला शनि, राहू-केतू आणि गुरु या चार ग्रहांचे संक्रमण होणार आहे. अशा स्थितीत हे चार ग्रह मिळून सर्व राशींवर प्रभाव टाकतील. म्हणूनच ज्योतिष शास्त्राने २०२४ संपण्यापूर्वी काही उपाय सुचवले आहेत, जेणेकरून २०२५ मध्ये तुम्हाला संपत्ती, ऐश्वर्य मिळून, प्रगतीपथावर नेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. जाणून घ्या उपाय...!
२०२५ मध्ये 'हे' ग्रह स्थलांतरित होणार!
२०२५ च्या सुरुवातीला शनीदेव स्वतःची राशी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश करतील. २९ मार्च २ रो०२५ रोजी ते मीन राशीत प्रवेश करतील. यानंतर मे महिन्यात राहु मीन राशीतून निघून कुंभ राशीत पोहोचेल. १८ मे २०२५ रोजी राहू मीन राशीत आणि केतू सिंह राशीत प्रवेश करेल. यासह गुरू वृषभ राशीतून बाहेर पडून २०२५ मध्ये मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरूचे संक्रमण १४ मे २०२५ रोजी मिथुन राशीतून होईल.
२०२५ मध्ये हे ४ मोठे ग्रह स्थलांतरित होणार आहेत. अशा परिस्थितीत, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी काही उपाय करणे आवश्यक आहे. जेणेकरुन नवीन वर्ष मंगलमय ठरेल आणि जीवनात सुख, समृद्धी, यश, कीर्ती लाभेल. पुढे दिलेले उपाय सर्व राशींसाठीच फायद्याचे ठरणार आहेत.
शनिपीडेपासून सुरक्षित राहण्याचे उपाय :
>> २०२५ मध्ये शनिचे संक्रमण होईल. या काळात पाण्यात साखर आणि काळे तीळ मिसळून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. सूर्योदयापूर्वी हा उपाय करावा.त्यामुळे शनिपीडा होणार नाही आणि शनि तुमच्यावर प्रसन्न होईल.
>> ते शक्य नसेल तर दर शनिवारी शनिदेवाच्या मंत्रांचा जप करा. 'ओम प्रं प्रेमं प्रुम् स: शनैश्चराय नम:' या मंत्राचा जप दर शनिवारी किमान १०८ वेळा करावा. हा उपाय केल्याने तुम्हाला शनीची साडेसाती आणि धैय्यापासून आराम मिळेल.
>> याशिवाय शनि मंदिरात जाऊन शनिदेवासमोर मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून दिवा लावा. या उपायाने शनिदेवाच्या प्रकोपापासून काही प्रमाणात आराम मिळेल.
राहू गोचर उपाय :
राहूला ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानले जाते. आपल्याकडून काही अनैतिक गोष्टी घडू नये म्हणून दिलेले उपाय करणे अत्यंत आवश्यक ठरेल. राहु १८ मे रोजी मीन राशीतून कुंभ राशीत जाईल. त्यासाठी आत्ताच दिलेले उपाय करा.
>> रोज एक जपमाळ 'ओम रा रहवे नमः' या मंत्राचा जप सुरू करा. याशिवाय पक्ष्यांना दररोज बाजरी खाऊ घाला. तसेच शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.
>> तसेच सोमवारी सकाळी काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावेत, त्यामुळे पापबुद्धी नष्ट होऊन सत्कार्याला प्रेरणा मिळेल.
केतू गोचर उपाय :
केतू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पुण्यसंचय करावा व त्यासाठी दानधर्म करावा.
>> केतूचा शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी घोंगडी, उडीद, उबदार कपडे, छत्री, इस्त्री इत्यादी गोष्टी दान करा.
>> तसेच केतूला प्रसन्न करण्यासाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला पोळी, भाकरी खाऊ घाला.
>> याशिवाय दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. या उपायाने केतूचा दुष्परिणाम होणार नाही!
गुरु गोचर उपाय :
गुरुबळ वाढावे म्हणून गुरु गोचर सुरु होण्यापूर्वी पुढील उपाय करावेत.
>> दर गुरुवारी अंघोळ करताना पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. असे केल्याने गुरुदोष कमी होईल आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.
>> गुरु ग्रहाला बळ देण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या गुरूच्या चरणांना स्पर्श करणे आणि त्यांना दररोज नमस्कार करणे.
>> तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुवारी उपास सुरु करावा आणि दत्त गुरु तथा भगवान विष्णूंची उपासना सुरु करावी.
२०२५ मध्ये गुरू देखील मिथुन राशीत पोहोचेल. १४ मे २०२५ रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल. म्हणून गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारपासून 'ओम ग्रं हरी ग्रां स: गुरवे नमः' या मंत्राचा जप सुरू करा.