Astrology Tips: तुमच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे? घाबरू नका, 'हे' बिनखर्चिक उपाय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 07:00 AM2023-01-17T07:00:00+5:302023-01-17T07:00:02+5:30
Astrology Tips: काल सर्प योग असणे हा काही दोष नाही, त्याचे निवारण करणे सोपे आहे, त्याआधी त्याची तीव्रता किती हे जाणकारांकडून जाणून घ्यावे आणि दिलेले उपाय करावेत.
>> ज्योतिषी सोनाली लिखितकर
काल सर्प योग असे नाव एखाद्या ज्योतिषाने किंवा गुरुजींनी काढले की समोरचा माणूस अगदी धास्तावून जातो. पण हा काल सर्प योग म्हणजे काय याचीही नीट माहिती नसते . आता आपण प्रथम हा योग काय आहे हे पाहू या. जेव्हां कुंडलीत राहू आणि केतू या ग्रहांच्या एकाच बाजूस सर्व ग्रह येतात त्याला कालसर्प योग झाला असे म्हणतात . तर कधी कधी एखादाच ग्रह या राहू आणि केतूच्या मधे असतो .आणि बाकी सर्व दुसऱ्या बाजूस असतात .याला अर्ध काल सर्प योग म्हणतात . या दोन्हीलाही काहीसे दोष कारक म्हणतात .परंतु नीट विचार केल्यास अशी स्थिती जितके दिवस असेल तेवढे दिवस जन्मणाऱ्या सर्व मुलांच्या कुंडलीत हा योग दिसेलच .पण खरे पाहता त्या सर्व मुलांना फार मोठ्या संकटातून जावे लागते असे काही नाही. मग हा दोषकारक आहे हे कसे ओळखावे ??
काही लोकांना याचे विविध त्रास होतात
१) घरामध्ये सतत भांडणे होणे
२) सतत भीती वाटणे
३)घरात अपंग अथवा व्यंगात्मक मूल जन्मास येणे .
४) कर्ज , सतत पैसा खर्च होणे
५) आत्महत्येचे विचार सतत मनात येणे .
६) करणी ,बाधा , भूत पिशाच या प्रकारचे त्रास होणे .
७) देवाधर्माच्या कार्यात रस न वाटणे.
असे विविध प्रकारचे त्रास किंवा किमान २ ,३ प्रकारचे त्रास ज्यांना होतात .पण आता ज्यांच्या कुंडलीत हा असेल त्यांनी काय करायचे असा प्रश्न उभा राहतो . आता सर्वात महत्वाचे म्हणजे जी १०, १२ लक्षणे दिली आहेत त्यापैकी काही लक्षणे आपल्या स्वतःला आढळत असतील तर आपली पत्रिका तज्ञ ज्योतिषास दाखवावी. केवळ पूजा विधी करणारे किंवा साधे गुरुजी इत्यादी लोकांना दाखवू नये. जाणकारच हवा आणि त्यामध्ये जर आपली पत्रिका पूर्णपणे दोषकारक असेल तरच नारायण नागबली ,त्रिपिंडी श्राद्ध आणि कालसर्प शांती यापैकी एक किंवा तिन्ही उपाय तीव्रतेप्रमाणे करावेत . हे विधी नाशिक जवळील त्रंबकेश्वर किंवा दारीयाबाद येथील तक्षक तीर्थ यासारख्या ठिकाणी केले जातात पण आता एकंदर पाहता १०० कालसर्प योगाच्या कुंडल्यांचा अभ्यास केल्यास त्यातील केवळ २५ % कुंडल्याच बाधित असतात किंवा शापित असतात .बाकीच्या कुंडल्याना साधे उपाय करूनही भागते .त्यांना नारायण नागबली यासारखे विधी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण जर आपल्या पत्रिकेत काल सर्प योग दिसतोय पण त्याची लक्षणे फारशी जाणवत नसतील, तर खालील उपाय करून पाहण्यास हरकत नाही
1)वडवानल स्तोत्राचा पाठ करणे .
2)बाधा असल्यास अंजन योग करणे
3)हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र या सारख्या प्रभावी स्तोत्रांचे रोज किमान 7 पाठ करणे किमान 21 दिवस .
4) सुंदरकांड चा पाठ करणे
5) ध्यान धारणा ,मंत्र जप चालू ठेवणे
6) खोटे बोलणे , मत्सर , लबाडी ,स्वार्थीपणा यापासून लांब राहणे ,आणि अशा वागणाऱ्या लोकांपासून देखील दूर राहणे
संपर्क 9890447025 .