Astrology Tips: महिन्याचं 'बजेट' सांभाळायचं असेल तर आठवणीने करा 'हा' विष्णुपुजेतील उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:04 AM2024-02-01T11:04:25+5:302024-02-01T11:04:57+5:30

Astrology Tips: आज फेब्रुवारीचा पहिला दिवस, पुढील महिनाभर आर्थिक चणचण जाणवू नये यासाठी ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय जरूर करा. 

Astrology Tips: If you want to manage the 'budget' of the month, remember to do 'this' remedy in Vishnu Puja! | Astrology Tips: महिन्याचं 'बजेट' सांभाळायचं असेल तर आठवणीने करा 'हा' विष्णुपुजेतील उपाय!

Astrology Tips: महिन्याचं 'बजेट' सांभाळायचं असेल तर आठवणीने करा 'हा' विष्णुपुजेतील उपाय!

एकीकडे बजेट २०२४ची घोषणा होत असताना दुसरीकडे आपल्याला घरचे बजेट सांभाळायचे असते. पूर्ण महिना आर्थिक अडचणीशिवाय जावा म्हणून ज्योतिष शास्त्राने उपाय दिला आहे. हा उपाय महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज करायचा आहे. 

फेब्रुवारीची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. गुरुवार हा दत्तगुरुंचा वार तसेच भगवान महाविष्णूंचा वार! आजच्या दिवशी दत्त पूजेला विष्णूपूजेची जोड देऊन पुढील उपाय केला असता पूर्ण महिना आनंदात आणि आर्थिक अडचणींशिवाय जाईल असे ज्योतिष शास्त्राचे म्हणणे आहे. उपाय साधा सोपा असल्याने आपणही तो अवश्य करून बघा. आजच्या दिवशी आपल्याला दत्त गुरु, भगवान विष्णू तसेच गुरु बृहस्पती यांची पूजा करायची आहे. ती कशी करायची आणि त्यामुळे लाभ कसा होतो तेही पाहू. 

आर्थिक लाभ होईल

गुरुवारी भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा करा. यानंतर तुळशीची पानं स्वच्छ धुवून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. ती पुरचुंडी कपाटात तिजोरीच्या जागी ठेवा. असे केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच आणखी एक पुरचुंडी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि घरात येणारे धन अवैध मार्गाने येणार नाही. 

अशी पूजा करा

गुरुवारी स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. सकाळी शक्य झाले नाही तर संध्याकाळी स्नान व पूजा करावी. यानंतर भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान त्यांना तुळशीमंजरी अर्पण कराव्यात. त्याचीच पाने आणि अभिषेकाचे तीर्थ प्राशन करावे आणि घरच्या मंडळींनाही द्यावे. विष्णूपूजेचे पाणी एखाद्या फुलाने घरात चारही बाजूंना शिंपडावे. त्यामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते. 

हे काम नक्कीच करा

गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते. तसेच या दिवशी भगवान विष्णूला केळीही अर्पण केली जातात. गुरुवारच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूला पिवळी फुले, हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करावा. तसेच विष्णूंच्या पूजेचा तो शिधा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावा. असे केल्याने साधकाच्या जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते.

बृहस्पती पूजा

असे मानले जाते की गुरुवारी बृहस्पती चालिसाचे पठण केल्याने कुंडलीत बृहस्पतिचे अर्थात गुरू स्थान मजबूत होते, गुरूबल वाढते, त्यामुळे साधकाचे वैवाहिक संबंध दृढ होतात. यासोबतच गुरुवारी बृहस्पती चालिसाचे पठण केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते.

Web Title: Astrology Tips: If you want to manage the 'budget' of the month, remember to do 'this' remedy in Vishnu Puja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.