दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वेद मंत्रांचा जयघोष करणार, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, पहा लोकमत भक्ती live!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 04:49 PM2020-11-13T16:49:56+5:302020-11-13T16:50:15+5:30
डॉ. राजीमवाले यांच्यासारख्या जाणकार व्यक्तीकडून वेद आणि मंत्र घोष ऐकणे ही रसिकांसाठी निश्चितच पर्वणी ठरेल. त्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता भेट द्या, लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलला.
जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते. वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. 'वेदोऽखिलो धर्ममूलम् |' वेदांवरून तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते. त्यांचे पुनर्वाचन आणि मंत्रघोषांचे पुनरुच्चारण करणे, ही काळाची गरज आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १४ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी ८ वाजता डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले 'वेद आणि मंत्र घोषांची' अपूर्व भेट घेऊन, लोकमत भक्ती युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहेत.
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे.
अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.
डॉ. राजीमवाले यांच्यासारख्या जाणकार व्यक्तीकडून वेद आणि मंत्र घोष ऐकणे ही रसिकांसाठी निश्चितच पर्वणी ठरेल. त्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता भेट द्या, लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलला.
https://www.youtube.com/watch?v=1pCD-XqhlA0