नैराश्य घालविण्यासाठी आध्यात्मिक गुरूंचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:47 AM2020-06-01T05:47:14+5:302020-06-01T05:47:57+5:30

लोकमत भक्ती : ३ जूनला सकाळी होणार वेबिनार

Awakening of the spiritual guru to relieve depression in Lokmat Bhakti | नैराश्य घालविण्यासाठी आध्यात्मिक गुरूंचे प्रबोधन

नैराश्य घालविण्यासाठी आध्यात्मिक गुरूंचे प्रबोधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगभरात पसरलेल्या कोरोनाने आजपर्यंत लाखो बळी घेतले आहेत. लॉकडाउनमुळे सामाजिक, आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. यातून नैराश्य आणि नकारात्मक भावना लोकांमध्ये वाढीस लागली आहे. घरातच राहणे, त्यात आर्थिक समस्या, भविष्याची काळजी अशी वेगवेगळी कारणे यामागे आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी गरज आहे, आत्मविश्वासाची आणि जिद्दीची. त्यासाठी ३ जूनला ‘लोकमत भक्ती’ या व्यासपीठावर आध्यात्मिक गुरूंचे प्रबोधन ऐकण्यासाठी ‘लोकमत’ने खास वेबिनार आयोजित केले आहे.


अध्यात्म आपल्याला एकमेकांमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यास मदत करू शकते. सकारात्मक राहण्यास आणि निरोगी आयुष्यासाठीही मदत करते. अशा संकटांत ‘लोकमत’ कायमच सामाजिक बांधिलकी दाखवत समाजासोबत असते. विविध उपक्रमांद्वारे समाजाला सकारात्मक दृष्टी, विचार देत असते. यावेळीही ‘लोकमत’ने तसा निश्चय केला असून, ‘लोकमत भक्ती’ या व्यासपीठावरील विशेष कार्यक्रमांतून आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन, त्यांचे प्रबोधन दर्शकांना लाभत आहे.


गेली अनेक वर्षे जीवनविद्या मिशन लोकांना जीवनोपयोगी मार्गदर्शन करीत आहे. त्याचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै आजच्या जगातील अध्यात्म आणि व्यावहारिकतेबद्दल आपले विचार ‘लोकमत भक्ती’ या व्यासपीठावरून मांडतील. तसेच पुरातन साहित्य आणि इतिहासाचे अभ्यासक असलेले गुरुदेव डॉक्टर शंकर अभ्यंकर हे आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत, ते ‘लोकमत भक्ती ’ या व्यासपीठावर आपल्या ऐतिहासिक संदर्भांचा उपयोग करून मार्गदर्शन करणार आहेत.

‘लोकमत भक्ती’ वेबिनारची वेळ :
बुधवार, ३ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हा
वेबिनार होणार आहे. त्यात सकाळी १० ते ११ या वेळेत प्रल्हाद पै मार्गदर्शन करतील आणि सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत गुरुदेव डॉ. शंकर अभ्यंकर मार्गदर्शन करतील.

हे वेबिनार
विनामूल्य आहे.
त्यात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.
इच्छुकांना https://bit.ly/2AoF9lK ही लिंक वापरून
नोंदणी करता येईल.

Web Title: Awakening of the spiritual guru to relieve depression in Lokmat Bhakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत